मुंबई :लोकसभा निवडणूकीच्या एक्झिट पोलच्या अंदाजावरुन देशात पुन्हा मोदी सरकरा येणार असल्याचे चित्र असले तरी हे आकडे फसवे आहेत. दोन दिवसांनी म्हणजेच येत्या चार जूनला मतमोजणीत सत्य सामोरे येईल. त्यामुळेच मोदींच्या विजयाचा आनंद दोन दिवसांचाच असेल असा टोला काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी भाजपाला लगावला आहे.
हा एक्झिट पोल आहे, निकाल नाही. त्यामुळे जेव्हा निकाल येईल तेंव्हा मोदी सरकार बदललेले दिसेल. सध्याघडीला १० पैकी ८ लोक मोदींच्या विरोधात बोलताना दिसत आहेत. भाजपने दिलेला पारचा नारा आता हवेत विरला आहे. त्यामुळे त्यावर फार काही बोलायची गरज नाही. मागील १० वर्षे जनतेने या सरकारचा त्रास सहन केला. अंतिम निकाल जेव्हा येईल त्यावेळी हा एक्झिट पोल चे निकाल बदललेले दिसेल, असा विश्वास विजय वडेट्टीवार यांनी बोलून दाखवला आहे.
