मुंबई : भाजपकडून विधानपरिषदेचे उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. भाजप विधान परिषदेच्या एकूण तीन जागा लढणार आहे. मुंबई शिक्षक आणि पदवीधरसहित, कोकण पदवीधरवर भाजपकडून उमेदवार घोषित करण्यात आले आहेत. कोकण विभाग पदवीधरमधून निरंजन डावखरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मुंबई पदवीधरमधून किरण शेलार तर, मुंबई शिक्षकमध्ये शिवनाथ दराडे यांना उमेदवारी घोषित करण्यात आली आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून कोकण पदवीधरसाठी अभिजीत पानसेंच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. या निवडणूकीसाठी येत्या २६ जून रोजी मतदान होणार आहे. तर १ जुलैला मतमोजणी होणार आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *