पालिवाल समाजातील ज्येष्ठ व्यक्ती आणि युवा उद्योजकांचा होणार सन्मान
ठाणे: सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या पालिवाल समाजातील ज्येष्ठ महनिय व्यक्तीचा तसेच समाजातील युवा उद्योजकांचा नॅप फाऊंडेशनच्या वतीने रविवार, 9 जून रोजी ठाण्यात सन्मान करण्यात येणार असल्याची माहिती नॅप फाऊंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा निकीता पालिवाल यांनी दिली आहे.
नॅप फाऊंडेशनच्या वतीने ठाणे शहरासह संपूर्ण भारतभर सामाजिक उपक्रमांचे आयोजन केले जात आहे. महिला सक्षमीकरण्याच्या उद्देशाने महिलांना स्वयंरोजगार मिळावा या उदात्त हेतूने नॅप फाऊंडेशनच्या माध्यमातून आयुर्वेदिक प्रसाधने बनविण्यात येत आहेत. या उत्पादानांची विक्री फाऊंडेशनच्या माध्यमातून लवकरच संपूर्ण भारतभर केली जाणार आहे. शैक्षणिक, आरोग्य आणि क्रीडा क्षेत्रातही नॅप फाऊंडेशन कार्यरत आहे.
9 जून रोजी महेश भवन, कासारवडवली येथे नॅप फाऊंडेशनच्या स्नेहसंमेलनाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमात सामाजिक क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणाऱ्या पालिवाल समाजातील ज्येष्ठ व्यक्तीचा तसेच भारतातील प्रमुख ८ राज्यातील युवा उद्योजकांचा सन्मान करण्यात येणार आहे. आताच्या तरुण पिढीला प्रेरणा मिळावी, या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन केल्याची माहिती निकीता पालिवाल यांनी दिली आहे. यावेळी महिलांनी उत्पादन केलेल्या आयुर्वेदिक प्रसाधनांचे प्रदर्शन मांडण्यात येणार असून विक्रीही करण्यात येणार आहे.
