राज्य अजिंक्यपद पॉवरलिफ्टिंग स्पर्धा

मुंबई : नुकत्याच परळ येथे झालेल्या राज्य अजिंक्यपद पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत ज्युनियर मुलांमध्ये कोल्हापूरच्या शामसुंदर कांबळे व मुलींमध्ये मुंबई उपनगरची हर्षदा गोळे व सब ज्युनिअरमध्ये मुंबई उपनगरचा क्रिश सोनार व पुण्याची कादंबरी राऊत यांनी स्ट्रॉंग वुमन व स्ट्रॉंग मॅन हा किताब पटकाविला.

राष्ट्रीय मिल मजदूर संघ, भोईवाडा व महाराष्ट्र राज्य पॉवरलिफ्टिंग असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने राज्य अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेला खेळाडूंचा जोरदार प्रतिसाद मिळाला.

स्पर्धेचा उद्घाटन समारंभ उदय देशपांडे, पद्मश्री पुरस्कार प्राप्त, अरुण केदार, छत्रपती पुरस्कार प्राप्त, सचिव महाराष्ट्र कॅरम असोसिएशन यांच्या हस्ते संपन्न झाला. बक्षीस समारंभ ॲड. प्रवीण शिंदे, सेक्रेटरी,जीएसटी असोसिएशन, ॲड. दत्तात्रेय उतेकर व संजय नारकर, सरचिटणीस ऑल इंडिया ज्युनिअर जीएसटी ऑफिसर यांच्या उपस्थितीत करण्यात आला. ही स्पर्धा राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे सरचिटणीस गोविंदराव मोहिते, संजय सरदेसाई यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे पार पडली.

स्पर्धेचा निकाल (विजेते खेळाडू)

ज्युनिअर पुरुष

५३ किलो – विराज पावसकर, (मुंबई उपनगर), ५९ किलो – वैभव जाधव, (मुंबई उपनगर), ६६ किलो – पार्थ तारे, (पालघर), ७४ किलो – श्यामसुंदर कांबळे, (कोल्हापूर), ८३ किलो – ओमकार भगत, (ठाणे),  ९३ किलो – नवाज खान (मुंबई उपनगर), १०५ किलो – रोशन गावकर, (मुंबई), १२० किलो – हर्षल पाटील, (कोल्हापूर), १२० + – सुमित जाधव,(कोल्हापूर)

ज्युनियर महिला

४३ किलो – मानसी हांडे, (मुंबई उपनगर), ४७ किलो – हर्षदा घोले, (मुंबई उपनगर) ५७ किलो – शुभांगी पाटील, (कोल्हापूर), ६३ किलो – सेजल मकवाना, (मुंबई उपनगर), ६९ किलो – प्रेरणा साळवी, (ठाणे), ७६ किलो – सेजल मोईकर, (पुणे), ८४ किलो – प्रतिभा लोणे, (ठाणे), ८४+ किलो – अनुष्का खोपीकर, (पुणे)

सब ज्युनिअर महिला

४३ किलो – गायत्री बडेकर, (रायगड), ४७ किलो – अपूर्वा घाटणे, (कोल्हापूर), ५२ किलो – तपस्या मते, (पुणे), ५७ किलो – सई शिंदे, (पुणे), ६३ किलो – नुपूर कुंभार, (सांगली) ६९ किलो – श्रेया सोनवणे, (मुंबई उपनगर), ७६ किलो – कादंबीनी राऊत, (पुणे)

सब ज्युनिअर पुरुष

५३ किलो – वेदांत कदम, (ठाणे), ५९ किलो – पृथ्वीराज देवर्डेकर, (कोल्हापूर), ६६ किलो – मयूर कोनकर, (ठाणे), ७४  किलो – जॉन्सन बुरुटे, (मुंबई उपनगर), ८३ किलो – क्रिश सोनार, (मुंबई उपनगर), ९३ किलो – प्रतीक तानाजी तावडे, (कोल्हापूर), १०५ किलो – महेश वाघमारे, (मुंबई उपनगर), १२० किलो – इशान सिंग, (मुंबई उपनगर)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *