नेरुळ ; महात्मा गांधी मिशिन विधी महाविद्यालय नेरुळ नवी मुंबई येथे विधी महाविद्याल यांच्या वतीने ५ जून रोजी  ज्वेल ऑफ नवी मुंबई येथे  वृक्ष रोपणाचा उपक्रम यशवीरित्या राबवण्यात आला विधी महाविद्यालय  च्या मुख्याध्यापीक शीला होसमानी  व महाविद्यलयातील विद्यार्थी , कर्मचारी, नवी मुंबई महानगपालिकेचे अधिकारी ,कर्मचारी ,व   ईतर विद्यार्थी आणि नागरिक यांनी सहभाग घेतला होता.

या उन्हाळ्यात साधारणतः तापमान हे ४५ अंश सेल्सियस च्या जवळ पास गेले होते पुढे काय होईल हे सांगणे कठीण आहे त्यामुळे वृक्षरोपण हि काळाची गरज झालेली आहे प्रत्येक माणसांनी किमान एक तरी झाड लावून संगोपन करून जगवले पाहिजे असा संदेश मुख्याध्यापिका शीला होसमानी यांनी  पर्यावरणदिनानिमित्त तेथे जमलेल्या विद्यार्थी ,महानगपालिकीचे कर्मचारी व नागरिकांना दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *