भारतीय जनता पक्षाचा चौखुर उधळलेला वारू उत्तरप्रदेशात अडला आणि महाराष्रात त चांगलाच अडखळला, असे विष्लेषण या लोकसभा निवडणूक निकालाचे करावे लागेल. देशात भरातीय जनता पक्षाला मागील २०१४ आणि २०१९ या दोन्ही लोकसभा निवडणुकीत घवघवित यश मिळाले होते २०१४ आणि २०१९ मध्ये भाजपाने अनुक्रमे २८२ आणि ३०३ जागा निव्वळ कमळ चन्हावर मिळवल्य होत्या आणि त्यात रालोआ मधील मित्रांची भर पडल्याने साडे तीनशे पुढे मोदींच्या मागे खासदार उभे होते. यावेळी भारतीय जनता पक्षाने मोदींच्या नेतृत्वात सलग तिसरी लोकसभा निवडणूक लढवली तेंव्हा कमळ चिन्हावर आलेल्या खासदारांची संख्या २४३ भरली तर रालामचे मित्र पक्षांचे बळ जमेस धरले तर सरकारच्या मागे २९१ खसादार उभे राहिलेले दिसल. यात बिहारचे लालु प्रसाद यादव आणि आंध्रचे चंद्राबाबु नायडू यांच्या तिकिटावर निवडून आलेल्या खासदारांची संख्या मोठी असून त्या शिवाय शिवसेना, पासवान यांच्या साराखे अन्य घटक अशा सर्वांचेही पाच सात एक दोन असे खासदार या आघाडीत आहेत. आता मित्रपक्षांच्या मदतीने राज्य करायचे असून त्यांची सत्तेची भूक वढल्यास भाजपाचे सत्तेतील वाटा कमी होणार आहे. या सर्व गणितात उत्तर प्रदेशात गमावलेल्या पस्तीस जागा आणि महाराष्ट्रात गमावलेल्या १४ जागा यांचा वाटा मोठा आहे. त्या शिवाय बंगामध्ये आणि राजस्थानातही भाजपाला काही जागांचे नुकसान सोसावे लागले आहे. यात महाराष्ट्रातील दारुण स्थितीचे विष्लेषण केल्या नंतर उपमुख्यमंत्री आणि येथील भाजपा मोहिमेचे सूत्रधार देवेन्द्र फडणवीस यांनी पराभवाची संपूर्ण जबाबादरी स्वीकारून राजीनामा देऊ केला आहे. अर्थात ते सरकार बाहेर पडून पक्षासाठी पूर्ण वेळ देऊ इच्छितात आणि जर दिल्लीतील नेत्यांना परवानगी दिली तर ते सरकारमधून बाहेर पडतील. अर्थातच असे होण्याची शक्यात दिसत नाही. भाजपा कोअर कमिटीची बैठक संपल्या नंतर फडणवीसांनी पत्रकार परिषद घेतली. त्यात पराभवाची मिमांसा करताना पूर्ण जबाबदारी पलीच होती हे सांगितले आणि शेवटी अचानक सरकारमधून बाहेर पडण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली. आणि ते ताडीने भाजपा कार्यलयातून निघून गेले. भाजपा कोअर कमिटीचे सदस्य अव्वाक होते. त्याच ठिकाणी काही वेळातच प्रांताध्क्ष बावनकुळे, मुंबईचे अध्यक्ष शेलार, चंद्रकांतदादा दादा पाटील अशा सर्व मंडळींनी तातडीने पुन्हा पत्रकार परिषद घेतली आणि फ़णवीसांनी असे करण्याची आवश्यकता नाही, सरकारमध्ये राहूनच त्यांनी पक्षासाठी अधिक काम करावे अशी विनंती सर्व कोअर कमिटीच्यावतीने केली. दिल्लीत सध्या पंतप्रधान नरेंद मोदींच्या तिसऱ्या टर्मसाठी जुळणी कऱण्याचे काम सुरु आहे. तिथे महाराष्ट्रातील पक्ष संघटनेचा विचार एव्हढ्यात करण्यासाठी कुणाला वेळ मिळेल असे वाटत नाही. नीतीश कुमार आणि चंद्राबाबु या मोठ्या मित्राची सत्ता वाटपाची मागणी काय राहील याची चिंता तिथे अधिक आहे. रालोआची सर्व पक्षनेत्यांची बैठक होण्या आधीच नीतीश कुमार यांचा दावा थेट पंतप्रधानपदावर वा उपपंतप्रधानपदावर दावा असू शकतो अशा चर्चा रंगल्या आहेत. तिथे फडणवीसांनी बाहेर पडावे की आत रहावे यावर सध्या तरी फार खल होणार नाही. पण फडणवीसांनी महाराषट्राच्या राजकारणात आणखी एक भूकंप करून टाकला असून त्याचे पुढे आणखी काही हादरे जाणवणारच आहेत हे नक्की. खरेतर महाराष्टरात इतके मोठे पानिपत का व्हावे हा प्रश्न कुणाला पडू शकतो. कारण भाजपा व मित्रपक्षांना दोन कोटी पन्नास लाखांच्या आसपास मते पडली तर शरद पवार, उद्धव ठाकरे व नाना पटोले यांच्या महा विकास आघाडीच्या सर्व उमदवारांना मिळून पडलेली मते दोन कोटी बावन्न लाख इतकी भरली. म्हणजेच फक्त दोन लाख मते अधिकची घेऊनही मविआने ३० जागा जिंकल्या तर भाजपाला मित्रपक्षांसह महायुतच्या नावे फक्त १८ जागा घेता आल्या. मागील दोन्ही लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रामधून अनुक्रमे ३९ आणि ४१ खासदार हे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मागे खंबीरपणाने उभे राहिले होते. या दोन्ही लोकसभा निवडणुकांमध्ये अखंड शिवसेना ही भाजपासमवेत लढली होती हेही इथे नमूद करावे लागेल. मोदी सरकारची दहा वर्षे पूर्ण होत असताना १८ व्या लोकसभेच्या स्थापनेसाठी जी निवडणूक झाली, त्यात महाराष्ट्रात मात्र अगदीच निराळ्या पद्धतीची लढाई झाली. शिवसेना आणि राष्ट्रवादी हे दोन मोठे पक्ष फुटले होते. त्यातील शिवसेना जी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात होती ती अधिकृतपणाने एकनाथ शिंदेंची झाली. धनुष्यबाण हे अधिकृत पक्ष चिन्हही शिंदेकडे आले होते. पण त्यांच्या वाट्याला आलेल्या पंधरा लोकसभेच्या जागा पैकी फक्त६ जागी त्यांना विजय मिळतो आहे. भाजपाने मित्रपक्षांच्या जागा कापून आपले स्वतःचे २८ उमेदवार या निवडणुकीत उतरवले होते. त्यांचा धुव्वा उडालेला दिसतो आहे. त्यांना दहा अकरा जागांवर मसाधान मानावे लागते आहे. आधीच्या दोन्ही लोकसभा विडणुकांमध्ये भाजपाचे २३ खासदार कमळ चिन्हावर लोकसभेत गेले होते. शरद पवारांना तुतारी वाजवणारा माणूस हे नवे चिन्ह आणि रा.काँ.(शप) हे नवे नाव घेऊन निवडणूक लढावी लागली. त्यांनी दहा उमेदवार उभे केले होते. त्यांना तब्बल आठ जागा मिळत आहेत. अजितदादा पवारांनी सहा महिन्यांपूर्वी थोरल्या पवारांपासून फारकत घेऊन राष्ट्रवादी हे नाव आणि गजराचे घड्याळ हे पक्षचिन्ह दोन्ही मिळवले. पण त्यांनी राज्यात चार जागा लढवल्या, त्यातील फक्त एक रायगडची जागा पदरात पडली आहे. सुनिल तटकरेंचा रायगडमधील विजय हा या वातावरणात महत्वाचा व मोठा मानावा लागतो आहे. कारण त्यांनी एकतर जागा राखली आणि अनंत गीते यांचा पुन्हा एकदा धुव्वा उडवत राखली. रायगडचे तीन विधानसभा मतदारसंघ ज्यांच्याकडे येतात त्या मावळ लोकसभा मतदारसंघांत शिंदेंचे शिलेदार श्रीरंग बारणे यांनी विजाय मिळवला. त्याच प्रमाणे खाली तळकोकणात नारायण राणे जिंकले, हा भाजपासाठी एकदम मोठाच दिलासा म्हणावा लागेल.आणि उद्धव ठाकरेंसाठीहाधक्का मानावा लागेल. राणेंचा पराभव हे ठाकरेंचे एक महत्वाचे ध्येय्य होते. ते विफल झाले आहे. सर्वात मोठा फटका या निवडणुकीत जर कोणाला बसला असेल तर तो उमेदवार नसणारे, पण सर्वार्थाने ही निवडणूक जिद्दीनेलढवणारे, भाजपाचे महत्वाचे सेना नायक असणारे, उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांना बसला आहे. त्यांनी राज्याच्या राजकारणाची सूत्रे गेली दोन तीन वर्षे सर्वतः स्वतःकडे ठेवली होती. त्यांनी मोदींच्या हिरीरीने महाराष्ट्रात प्रचारही केला. त्यांनी जवळपास सव्वासे सभा राज्यात सर्वत्र घेतल्या. पक्षाने त्यांना देशस्तरावरील प्रचारातही सहभागी करून घेतले होते. पण भजापाचा गड राज्यात राखणेहे फडणवीसांना जमलेले नाही. यापुढचे त्यांच्यापुढेच मोठे आव्हान हेविधानसभा निवडणुकीचे राहणार आहे. त्यात ते व त्यांचा पक्ष कशा पद्धतीने कामगिरी करतो हे पाहणे महत्वाचे ठरेल. राहुल गांधींच्या नेतृत्वात काँग्रेसने देशभरात एकूण३१७ जागा लढवल्या आणि त्यातील ९९ जिंकल्या असून त्यांच्या मित्रपक्षांनी आणखी सव्वाशेच्या आसपास जागा जिंकल्या त्यामुळे तायंची एकूण संख्या २३४ झाली आहे. इंडी अलायन्सच्या पक्षांनी केरळ, पश्चिम बंगाल, पंजाब, ओरिसा, मेघालय, आसाम, मीझोराम आदि अनेक राज्यात स्थानिक स्तरावर मैत्रीपूर्ण लढतीही केल्या. त्या जागांची संख्या होती २७०. या निकालात देशस्तरावर नेमके काय झाले हे बघणे रंजक ठरावे. उत्तर भारतात एकूण १५१ जागा आहेत. त्यातील एनडीएने ८३ जागा घेतल्या तर इंडि आघाडीने ७२ जागा घेतल्या. यात समाजवादी पार्टीने अखिलेश यदव यांच्या नेतृत्वात एकट्या उत्तरप्रदेशात जिंकलेल्या ३६ जागांचा समावेश आहे. अन्य पक्षांनी इथे ६ जागा घेतल्या. पश्चिम भारतात गुजराथ महाराष्ट्र राजस्थान अशा ७८ जागा असून त्यातील एनडीएने ३४ घेतल्या. इंडि आघाडीने ३२ घेतल्या. दोन जागा अन्य पक्षांकडे गेल्या. मध्यभारतात ( मध्यप्रदेश) ४० जागा असून त्यातील ३९ रालोआकडे असून १ जागा इंडीआकडे गेली. पूर्व भारतात ११८ जागा आहेत ( पं. बंगाल, ओरिसा आदि ) त्यातील रालाने ७२ जागा घेतल्या असून इंडि आघाडीने ४५ घेतल्या आहेत. १ जागा इतार पक्षाकडेआहे. ईशान्य भारतात २५ जाग असून त्यातील १५ एनडीएकडे गेल्या आहेत. इंडी आघाडीने ७ तर इतरांनी ३ जागा घेतल्या आहेत. दक्षिण भारतात १३१ जागा असून त्यातील ४९ एनडीए नेतर ७७ इंडि आघाडीने घेतल्या आहेत. ५ जागा इतर पक्षांकडे गेल्या. अशा प्रकारे ५४३ पैकी भाजपा प्रणित एनडीए आघाडीकडे २९२ तर इंडि आघाडीकडे २३४ आणि इतर पक्षांकडे १७ जागा आहेत. या सर्व निकालात ही बाब स्पष्टच आहे की भारतीय जनता पक्षाने या निवडणुकीत वाईट कामगिरी केलेली नाही. पण मागील दोन निवडणुकांतील घवघवित यशापुढे त्यांची या निवडणुकीतली कामगिरी फिकी पडली आहे. त्याची एक निराशा त्यांच्या नेत्यांमध्ये कार्यकर्त्यांमध्ये दिसते आणि तीच फडणवीस यांच्या राजनाम्याच्या तयारीमधून व्यक्त होते.