मुंबई : “लोकसभेच्या निकालानंतर महाराष्ट्राच्या जनतेने देवेंद्र फडणवीसांना जबाबदारीने मुक्त केलं आहे. त्यांना विधानसभेसाठी मुक्तता हवी असेल तर विधानसभेला महाविकास आघाडी १८५ जागा जिंकल्यानंतर कायमची मुक्तता मिळेल. त्यानंतर त्यांना इतर संस्था आहेत. वनवासी आश्रम वगैरे संस्था आहेत. तिथेच जाऊन काम करावे लागणार आहे” अशी खोचक टीका खासदार संजय राऊत यांनी केली.

संजय राऊत म्हणाले,  महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीसांनी विष पेरलं. देवेंद्र फडणवीसांना महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला काळीमा फासण्याचे काम केलं. मी सकाळीच म्हणालो. पेशवे काळात आनंदीबाई होत्या. तसे फडणवीस राजकारणातले आनंदीबाई आहेत. कट कारस्थानं करणं आणि स्वार्थ साधणं यापेक्षा दुसरं काही त्यांनी केलेलं नाही. त्यांना राज्यात नेतृत्व करण्याची उत्तम संधी होती. त्यांनी ती गमावली आहे. महाराष्ट्राच्या राजकारणातील खलनायक कोण असतील तर ते देवेंद्र फडणवीस आहेत, हे रस्त्यावरचा बच्चा बच्चा सांगेन. त्यासाठीच हे मतदान झाले आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या दळभद्री राजकारणावरचा हा रोष आहे. असेही राऊत म्हणाले

 सरकार पाडण्यासाठी तुम्ही हुडी घालून फिरत होतात. तुम्ही महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात आणि विदर्भात जाऊन पाहा, लोक तुमच्याबाबत काय बोलत आहेत. लोकांनी यांना लाथा मारुन बाहेर काढलं आहे. नितीन गडकरी स्वत:च्या ताकदीवर निवडून आले आहेत. अकोल्याची जागा तिरंगी लढतीमध्ये सटकून गेली. बाकी सर्वत्र आमची महाविकास आघाडीच आहे. असेही राऊत म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *