धारावी : वीरशैव कक्कया कल्याण मंडळ, मुंबई यांच्या वतीने संत कक्कया आर्थिक विकास महामंडळाच्या मागणीसाठी मंगळवारी सकाळी १०.३० वाजता आझाद मैदानात राज्यव्यापी धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. राज्यातील समाजबांधवांनी आंदोलनासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
आंदोलनाच्या पूर्वतयारीसाठी सोमवारी श्री गणेश विद्या मंदिर हायस्कूल, धारावी येथे एका बैठकीचे आयोजन केले आहे. कक्कया-ढोर समाजाचे स्वतंत्र शासकीय महामंडळ निर्माण करावे, या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात येणार आहे. आजपर्यंतच्या कोणत्याही सरकारकडून आम्हाला न्याय मिळालेला नाही. तसेच वीरशैव कक्कया-ढोर समाजानेदेखील कुठलेही आंदोलन करून न्याय हक्कांची मागणी केली नाही, असे आयोजकांनी सांगितले.
