सचिन अहिर यांचा गुगली !

मुंबई : लोकसभा निवडणूकीत भाजपाप्रणित महाविकासा आघाडीचा दारूण पराभव झाला. त्यातही एकनाथ शिंदे यांच्या १५ पैकी सात जागा फक्त निवडून आल्या. माझा एक जरी सहकारी पडला तरी मी राजीनामा देईन अशी घोषणा विधानसभेत करणाऱ्या शिंदेंच्या या निराशाजनक कामगिरीमुळे शिंदे गोठात सहा आमदार अस्वस्थता असल्याच्या बातम्या वृत्तवाहीन्यांवर झळकू लागल्या आणि अफवांना एकच उधाण आले. त्यात शिवसेना नेते सचिन अहिर यांनी भर घातली. उध्दव ठाकरेंच्या संपर्कात सहा नव्हे

चाळीस आमदारही असू शकतात असे विधान त्यांनी केल्याने माध्यमांना ब्रेकींग न्यूज मिळाली.आतापर्यंत एकूण सहा आमदारांनी उद्धव ठाकरे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असल्याची माहिती ठाकरे गटाच्या वरिष्ठ नेत्यांनी वृत्तवाहीन्यांना दिली आहे. ज्या आमदारांनी तटस्थ भूमिका घेतली, त्यांचाच विचार ठाकरे गटाकडून केला जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. यावर प्रतिक्रिया देताना संपर्कात असलेल्या आमदारांती संख्या 40 असू शकते, अशी प्रतिक्रिया ठाकरे गटाचे आमदार सचिन अहिर यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

ठाकरे गटाचे नेते सचिन अहिर यांनी बोलताना अनेक गौप्यस्फोट देखील केले आहेत. आमच्या संपर्कात सहा ते सात आमदार असल्याची माहिती कुठून समोर आली माहिती नाही. मात्र, हा आकडा १६ किंवा अगदी ४० च्या घरातही असू शकतो. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर शिंदे गटातील आमदार अस्वस्थ झाले असतील. आता आपलं सरकार जाणार, ही भीती त्यांच्या मनात असावी. त्यांची भीती आणि अस्वस्थता स्वाभाविक आहे. त्यांच्या मतदारसंघात आणि कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता आहे. हा प्रयोग काही आता झालेला नाही. लोकसभा निवडणुकीच्यावेळी शिंदे गटातील काही आमदारांनी ठाकरे गटाशी संपर्क साधला होता. आम्ही लोकसभेला तुम्हाला मदत करु, पण विधानसभेला आमचा विचार करा, असा प्रस्ताव शिंदे गटातील या आमदारांनी ठाकरेंसमोर ठेवला होता, असे सचिन अहिर यांनी म्हटलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *