कोकण पदवीधर मतदारसंघ निवडणूक

मुंबई : लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बिनशर्त पाठींबा देत महायुतीच्या सभांमध्ये सहभागी झालेले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा कार्यकर्त्यांना च्रकावून टाकणारा निर्णय घेत कोकण पदवीधर मतदार संघातील निवडणूकीतून माघार घेतली आहे. राज ठाकरेंच्या या ‘मनसे’ माघारीमुळे कार्यकर्ते मात्र संभ्रमित झाले आहेत.

भाजपचा बालेकिल्ला समजला जाणाऱ्या कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत मनसेकडून अभिजीत पानसे यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. राज ठाकरे भाजपला नडणार… लोकसभेच्या पाठींब्याच्या बदल्यात ही जागा लडविणार असे बार मनसैनिकांनी सोशल मीडीयावर उडवायला सुरुवात केली होती. त्यानंतर मनसे वि. भाजप असा सामना रंगणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. पण या चर्चां क्षणभंगूर ठरल्या.

अखेर राज ठाकरेंची मनधरणी करण्यात भाजपला यश आले असून कोकण पदवीधर निवडणुकीतून राज ठाकरेंनी माघार घेतली आहे.भाजपने राज ठाकरेंची मनधरणी करण्यासाठी निरंजन डावखरे आणि प्रसाद लाड यांना राज ठाकरेंचे निवासस्थान असलेल्या शिवतिर्थावर पाठवले. आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता.  सकाळीच  शिवतिर्थावर पोहचलेल्या प्रसाद लाड आणि निरंजन डावखरे यांना राज ठाकरेंची मनधरणी करण्यात यश मिळाले. त्यानंतर राज ठाकरेंनी माघार घेण्याचा निर्णय घेतला.

 भाजपकजून निरंजन डावखरे रिंगणात आहेत.  डावखरे हे मागच्या दोन टर्मपासून कोकण पदवीधर मतदारसंघात आमदार आहेत. डावखरे यांच्यासाठी मनसेने माघार घेतली आहे. या अगोदर देवेंद्र फडणवीसांनी देखील राज ठाकरेंची भेट घेतली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *