मुंबई : सर्व्हे नावाचं भूत जे भाजपच्या डोक्यात गेलेलं ते आता निघेल. एका मतदारसंघात 12 सर्व्हे केल्याने काही होतं नाही. नागरिकांची मतं ही महत्वाची आहेत. आम्हाला अतिआत्मविश्वास नडला, आता भाजपाच्या सर्व्हेच्या च्या दबावतंत्राला आम्ही बळी पडणार नाही  असे शिवसेना आमदार संजय शिरसाट यांनी ठणकावून सांगितले.

 ही निवडणूक सामंजस्यातून लढवली गेली. आता त्यांना दोन्ही पक्षाचं ऐकावं लागेल. झाल ते गेलं यापुढे सर्वांच्या संमत्तीने उमेदवार दिले, प्रयत्न केले तर सरकार यायला काही अडचण नाही, असेही शिरसाट म्हणाले.  मोदींच्या नावावर किंव चेहऱ्यामुळे खालची नेते मंडळी सुस्थावली गेली. काही लोकांची वक्तव्यही अतिउत्साही होती. तुम्ही बोलता हे लोकं एकत असते त्यानुसार ते मत बनवतं असतात, लोकांची मत मतपेटीपर्यंत न्यायची असतील तर त्यांच्यात जावं लागेल. वादग्रस्त वकतव्याबाबत नेत्यांनी सावधगिरी बाळगली पाहिजे, असे संजय शिरसाट म्हणाले.

लोकसभेला झालेल्या चुका या विधानसभेला होणार नाहीत, विधानसभेला उमेदवारही लवकर जाहिर होईल, यादीही लवकर जाहिर केली जाईल, असेही ते म्हणाले. आमच्यावर तसा दबाव नव्हता मात्र केंद्रात सत्ता हवी भाजप एक पाऊल पुढे आहे. मोदींना पंतप्रधान बनवायचं आहे. त्यांची आयडोलॉजी वापरली तर फायदा होईल. म्हणून त्यांच्या मर्जीनुसार आमचा कल त्यांच्याकडे झुकला. मात्र त्याचं गणित चुकलं त्याचा फटका बसला. मात्र ते मान्यही त्यांनी केलं, असेही शिरसाट यांनी सांगितले.

संजय राऊत यांना सरकार पढायला फार वेळ आहे. आमच्या उठावानंतर ते अनेक तारखा देत होते. आता बंद झालं बोलणं, जे आहे ते पाडू शकले नाहीत. दिल्लीत यांना मोजतयं कोण ?  असा टोला संजय शिरसाट यांनी लगावला.

आमदार फूटू नयेतस म्हणून संजय राऊतांनी असा दावा केलाय.  त्यामुळे तुम्ही जाऊ नका तेच आपल्याकडे येत आहेत.असं उलटं गणित मांडण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. या अनुशंगाने ते वक्तव्य केलं आहे. परंतु त्यांच्यामुळे पक्षाचा सत्यानाश केला आहे, असे शिरसाट म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *