उल्हासनगर : उल्हासनगर महापालिका आयुक्त डॉ .  अझिझ शेख यांनी १ नोव्हेंबर २००५ च्या नंतर महापालिकेत रुजु झालेल्या कर्मचाऱ्याना सुरक्षित किट ( प्राण किट ) चे वाटप केले आहे. या बाबत आयुक्तानी सांगितले की या कर्मचाऱ्यानी आपल्या वेतनातील एक हिस्सा हा शेअर बाजारात गुंतवला पाहिजे. त्यामुळे आर्थिक बळकटी येण्यास मदत होईल.

उल्हासनगर महापालिकेत १ नोव्हेंबर २००५ नंतर महापालिकेच्या सेवेत सादर झालेल्या कर्मचाऱ्यासाठी  शासनाने  अंशदायी  योजना लागु केली असुन त्याच धरतीवर उल्हासनगर महापालिकेने राष्ट्रीय पेंशन योजना लागु केली आहे. दरम्यान काही कर्मचाऱ्याना सेवा निवृत्ती खात्यात सुरक्षित जमा म्हणुन अंशदान रक्कम वेतनातुन कपात करण्यात येणार आहे. तर या कर्मचाऱ्यांचे मासीक वेतन सरळ शेअर बाजारात जमा करण्यात येणार असल्याची माहीती आयुक्त डॉ . अझिझ शेख यांनी दिली आहे. या मध्ये या कर्मचाऱ्याना भविष्य निधी पेक्षा ही जास्त व्याज परत मिळणार आहे. या प्राण किट कार्यक्रमाला  नगररचना सहायक संचालक ललित खोब्रागडे , उपायुक्त डॉ . सुभाष जाधव , मुख्य लेखाधिकारी किरण भिलारे , लेखा परिक्षक शरद देशमुख , जनसंपर्क अधिकारी छाया डांगळे यांच्या सह शेकडो कर्मचारी उपस्थित होते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *