पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेत असताना महाराष्रा ातील भारतीय जनता पक्ष मात्र अजुनी दुःखाच्या सावटातून बाहेर आलेला दिसत नाही. खरेतर भाजपा कार्यकर्त्यांना दुःखा पेक्षाही अधिक मोठा मानसिक धक्काही बसलेला आहे. जो पक्ष राज्याच्या विधानसभेत 220 पेक्षा अधिक जागी मित्र पक्षांसह विजय मिळवण्याच्यी स्वप्ने पाहात होता तो पक्ष आज 48 पैकी 28 जागा लढवल्या नंतरही लोकसभेच्या फक्त नऊ जागांवरच विजयी झालेला आहे. रावसाहेब दानवे, सुधीर मुनगंटीवार, पंकजा मुंडे, डॉ भामरे, कपील पाटील, भारती पवार असे मोठे नेते सपशेल पराबूत झाले आहेत. पंकजा मुंडे यांचा उल्लेख त्यांचे कार्यकर्ते राज्याच्या भावी पहिल्या मुख्यमंत्री, जनतेच्या मनातील मुख्यमंत्री असा करत असतात. ओबीसी समाजाचे देशव्यापी नेतृत्व मानले गेलेल्या गोपिनाथ मुंडे यांचा समर्थ वारसा त्यांच्याकडे आहे. राज्यातली मोठ्या वंजारी व ऊसतोड मजुरांच्या संघटनेच्या त्या नेत्या आहेत. वंजारी समाज हा ओबीसीं मधील मोठा घटक त्यांच्याकडे आशेने पाहात होता. अशाही स्थितीत त्यांचा दारूण पराभव बीड मध्ये झाला. सुधीर मुनगंटीवार हेही राज्याच्या मंत्रीमंडळातील चमकते सितारे होते. तेही दणदणित आपटले आणि तेही स्वतःच्याच चंद्रपूर गडचिरोली मतदारसंघांत. तिथे आदिवासी बहुल वनक्षेत्र आहे. वर्षानुवर्षे सुधीरभाऊ तिथे काम करत होते. पण त्यांना ती जागा काँग्रेसकडून खेचून घेता आली नाही. भाजपाला जिव्हारी लागणारे असे पराभव महाराष्ट्रात जागो जागी झाले. त्याची कारणे काय असतील या विचाराने कार्यकर्ते हैराण होत होते. उपमुख्यमंत्री आणि भाजपाच्या राज्यातील प्रचार मोहिमेचे प्रमुख देवेन्द्र फडणवीस यांनी पराभवानंतरच्या कोअर समितीच्या बैठकीत पक्षाला आणखी मोठा शॉक दिला. ते म्हणाले की मी आता सरकारमधील पद सोडतो. त्यांच्या राजीनाम्याच्या घोषणेचे वा राजीनामा देण्याच्या मानसिकतेचे वर्णन राज्यातील राजकीय भूकंप असे केले जाऊ लागले तेही सहाजिकच होते. कारण फडणवीस बाहेर पडले तर एकनाथ शिंदेंचे सरकार अस्थिर होणे स्वाभाविकच आहे. तसे झाले तर राष्ट्रवादीचे नेते अजितदादा पवारां पुढेही बाहेर पडण्या शिवाय कोणता मार्ग उरेल, हही प्रश्न होताच. कारण भाजपा पेक्षाही मोठी हार दादा गटाची झालेली आहे. व्यक्तीगत अजितदादंसाठीही फार मोठी हार आहे. पाच जागा लढवून केवळ एक जागा ते जिकंले. बारामतीतही पत्नीचा पराभव त्यंना पहावा लागला. जी जागा जिंकलीही रायगडची. अनेक परिणाम फडणवीसांच्या राजीनाम्याचे संभवले असते यात शंका नाही. पण आपण कोणत्याही निराशेतून अथवा पळ काढण्याच्या मनसिकते मधून तो विषय सुरु केला नाही, असा दावा फडणवीसांचा आहे. घोषणा केली त्याच रात्री दिल्लीत त्यांनी अमित शाहां बरोबर दोनदा, जे. पी. नड्डां बरोबरही एकदा चर्चा केली. महाराष्ट्रातील भाजपाचाच्य विधानसभा विजयासाठी काय काय करावे लागेल हे सारे सविस्तर त्यांनी शहांना सांगितले आपली ऱणनीती ऐकवली व त्यासाठी बाहेर पडण्याची परवानगी मागितली. तूर्तास त परवानगी मिळालेली नाही. शनिवारी त्यांनी मुंबईतील वसंत स्मृती भाजपा कर्यालयात सर्व आमदरांची बैठक घेतली. तिथेही आमदारांनी ठराव करून, देवेन्द्रजी तुम्ही राजीनामा देऊ नका, तुम्ही सरकारमध्ये असणे गरजेचे आहे. पण आमदार वा नेते नव्हे तर शेवटी शहा व मोदी जे ठरवतील तेच भाजपात होत असते. देवेन्द्र फडणवीस यांनी आमदारांच्या बैठकीत भाजपाचा पराभव नेमका का झाला, याची मिमांसा केली आणि ती राज्यातील प्रत्येक राजकीय नेत्यानेही मनन करण्याजोगी आहे. ते म्हणाले की 28 जागा लढवून भाजपाने केवळ 9 जागा मिळवल्या हा पराभव नक्कीच होता पण तो का व कसा झाला हे पाहणे महत्वाचे आहे. निवडणुकीच्या पहिल्या टप्प्या आधीच एक नरेटिव्ह सेट केला गेला की भाजपाने मित्र पक्षांसह 400 जागा जिंकल्या तर संविधान बदलले जाईल. ही भीती समाजाच्या तळाच्या माणसापर्यंत इतकी पसरली होती की ती पुसून काढणे भजापाला कही काळ शक्य झाले नाही. या नरेटिव्हला पर्यायी नरेटिव्ह वागने पढे करण्यात भाजपा कमी पडले. त्यामुळे पहिल्या दोन तीन टप्प्यांतील राज्यातील 24 जागंमध्येच प्रामुख्याने भाजपाचा पराभव झालेला दिसतो. तिसऱ्या टप्प्या पासून भाजपा नेत्यांचे म्हणणे की ते संविधान अजिबात बदलणार नाहीत, देशात कोणालाही तसे करताच येणार नाही, हा विचार जनसामान्यांपर्यंत पोचू शकला. त्यातून पुढच्या टप्प्यांतील 24 जागांमध्ये भाजपा व मित्रपक्षांच्या उमेदवारांना चांगले यश मिळाले. देवेन्द्र भाऊंचे म्हणणे असेही आहे की महायुती व महा आघाडीच्या एकूण मतांमध्ये अंतर अगदीच कमी आहे. केवळ अर्ध्या टक्क्या पेक्षाही कमी मतांनी भजापचा घात केला आहे. भाजपा शिदेंची शिवसेना व दादांचा राष्र् वादी या तिघांना मिळालेली मते ही 43.3 टक्के आहेत तर उबाठा, श.प.राकाँ आणि काँग्रेस यांच्या महाविकास आघाडीला मिळालेली मते 43.6 इतकी आहेत. मुंबईत तर उलटे घडले आहे. मुंबईतील महायुतीचे मते 26 लाख भरली तर महा आघाडीकडे त्यापेक्षा दोन लाख कमी, म्हणजे 24 लख मते गेली. तरीही आघाडीचे चार तर युतीचे फक्त दोनच खासदार संसदेत पोचेल आहेत. हे असे का झाले याचे कारण विशिष्ठ विधानसभा मतदारसंघांत आघाडीने प्रचंड असे मताधिक्य घेतले आहे. त्यामुळे बहुसंख्य विधानसभा क्षेत्रात पुढे राहूनही महायुतीला प्रत्यक्षात कमी जागा पदरी पडल्या. मुस्लीम बहुल विधानसबा क्षेत्रात आघाडीने 80 ते 90 टक्के मते घेतल्याने त्यांचे उमेदवार अचानक पुढे सरकले आणि चार ते पाच विधानसभा क्षेत्रात आघाडी घेणाऱ्या महायुतीच्या उमेदवारांचा पराभव त्या एकेका विधानसभा मतदारसंघाने घडवला, अशी मांडणी भाजपाने केलेली दिसते. फडणवीस सांगतात की 73 विधानसभा क्षेत्रात भाजपाच पुढे आहे. महायुतीच्या मित्रपक्षांसह आपण 133 विधानसभा मतदार संघांत आघाडी घेतलेली आहे. महा आघाडीपेक्षा आपण पुढे आहोत. आता विधानसभा निवडणुकीत भाजपा व मित्रपक्षांनी फक्त दीड ते तीन टक्क्यांचा फरक करायचा आहे. हा आकडा दिसायला लहान वाटत असला तरी प्रत्यक्षात मोठा मतांचा फरक करण्याची गरज लागेल. कारण साडे तीन ते चार लाख मतदारसंघातील दीड ते तीन टक्के मते, म्हणजे बारा ते पंधरा हजार मते, महाआघाडीकडून महायुतीकडे वळली तर युती पढे झाईल. जी मते लोकसभा निवडणुकीत महा आघाडीकडे गेली ती पुन्हा महायुतीकडे परत वळवण्याचे आव्हान उभे आहे ते सोपे नक्कीच नाही. प्रचंड कम करावे लागेल. लोकांना समजून घ्यावे लागेल. लोकांना समजाऊनही सांगावेही लागेल. स्थानिक प्रश्न हे या निवडणुकीत मोठे ठरतील. ते कसे सोडवणार ? पुढच्या तीन महिन्यांच्या अवधीत ते प्रश्न किती सुटणार? हे सारेच अधांतरी आहे. विधानसभा निहाय बैठका घेण्याचे सत्र महायुतीच्या शीर्षस्थ नेत्यांना आता सुरु करावे लागेल. विधानसभा निवडणुकीची वाट ही प्रत्यक्षात बिकटच आहे हे नक्कीच ! लोकसभा निवडणुकीत विरोधकांनी केलेला खोटा प्रचार फार दिवस टिकणारा नाही.विरोधकांच्या अपप्रचाराला योग्य उत्तर देऊन विधानसभा निवडणुकीत महायुतीचा झेंडा फडकविल्याखेरीज मी थांबणार नाही, असा निर्धार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी व्यक्त केला. उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी निकालाची आकडेवारी मांडून महायुतीचा पराभव झाला हा प्रचार खोटा असल्याचे दाखवून दिले. श्री. फडणवीस म्हणाले की, या निवडणुकीमध्ये भाजपाचे नेतृत्व मी केल्यामुळे या निकालाची जबाबदारी माझी आहे. आपण सर्वांनी अतिशय उत्तम काम केलं. केवळ राजकीय गणित जुळवाजुळवीमध्ये आम्ही कमी पडलो. मला मोकळं करून काम करायची संधी द्या, असे मी निराशेतून बोललो नाही.देवेंद्र फडणवीस हा पळणारा नाही, तर लढणारा आहे.
चारही बाजूनी घेरल्यानंतर पुरंदरचा तह करणारे आणि नंतर पुन्हा पूर्ण ताकदीने मैदानात उतरून ते सर्व किल्ले पुन्हा जिंकणारे छत्रपती शिवाजी महाराज आमची प्रेरणा आहेत.कोणाला जर असं वाटलं असेल की मी निराश झालो आहे आहे तर ते खरं नाही. माझ्या डोक्यात काही रणनीती होती आणि ती आजही आहे,असेही श्री.फडणवीस म्हणाले.उबाठा ला मुंबई महानगर क्षेत्रात मतदारांनी नाकारले असल्याचे श्री. फडणवीस यांनी निकालाच्या आकडेवारीसह निदर्शनास आणून दिले. श्री. फडणवीस म्हणाले संविधान बदल, मराठा आरक्षण यासारख्या मुद्द्यावर खोटी माहिती पसरवून त्या आधारे महाविकास आघाडीने विजय मिळवला.हा खोटा प्रचार विधानसभा निवडणुकीपर्यंत टिकणार नाही. त्या मुळे आपण सर्वांनी आतापासून विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागावे, असेही श्री.फडणवीस यांनी नमूद केले.
