नवी दिल्ली : एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि आमची एकत्रित चर्चा झाली आहे. सरकारच्यावतीने सगे सोयरे बाबत निर्णय घेण्याबाबत काय, कुणी बोलायचं हे आमचं ठरलं आहे. आम्ही लक्ष घालून मार्ग काढू, लवकरच यावर तोडगा काढू असं राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी म्हटलं आहे.
देशाच्या पंतप्रधानपदाची शपथ नरेंद्र मोदी घेत आहेत. या सोहळ्यासाठी आम्ही सर्वजण आलो आहोत. आज आम्ही शपथविधीसाठी आलो आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्रफडणवीस यांच्या सोबत मीटिंग झाली. काल रात्री आमच्या सोबत संपर्क करण्यात आला. रात्री जे.पी. नड्डा, अमित शाह यांच्यासमवेत आमची चर्चा झाली. त्यावेळीं मी त्यांना विनंती केली होती की आम्हाला देखील मंत्रिपद मिळावं. आता लवकरच आमची संसदेत ४ संख्या होणार आहे. आम्हाला १ जागा मिळावी यासाठी विनंती केली, असल्याचं अजित पवार म्हणाले.
काल त्यांचा आम्हाला मॅसेज आला की शिंदेंना जसा स्वतंत्र पदभार असणारे खाते दिले आहे. तसं तुम्हाला देखील देऊ परंतू आम्हाला तसं नको होतं. आम्ही कॅबिनेट मंत्रिपदाची मागणी केली होती. लवकरच ती देखील पूर्ण केली जाईल, असं अजित पवार यांनी म्हटलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *