‘छावणी’ या प्रसिद्ध साहित्यिक अर्जुन डांगळे यांच्या
अनिल ठाणेकर
ठाणे : कर्मवीर दादासाहेब गायकवाड सांस्कृतिक केंद्र, मुंबई व सायन पब्लिकेशन प्रायव्हेट लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने ‘छावणी’ या प्रसिद्ध साहित्यिक अर्जुन डांगळे यांच्या अमृत महोत्सव गौरव ग्रंथाचे शनिवारी १५ जून रोजी प्रकाशन व चर्चा विजय जाधव यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेली आहे.याप्रसंगी प्रमुख वक्ते सुभाष देसाई, दिनकर गांगल, डॉ. मनोहर जाधव व डॉ. प्रज्ञा दया पवार हे उपस्थित राहणार आहेत
‘छावणी’ या प्रसिद्ध साहित्यिक अर्जुन डांगळे यांच्या अमृत महोत्सव गौरव ग्रंथाचे प्रकाशन व चर्चा हा कार्यक्रम शनिवारी, १५ जून २०२४ रोजी सायंकाळी ५ .३० (साडेपाच वाजता) सम्राट अशोका हॉल, पहिला मजला, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जन्मशताब्दी भवन, चार बंगला, लोखंडवाला रोड, अंधेरी – पश्चिम, मुंबई येथे आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमास विशेष अतिथी डॉ. महेंद्र भवरे, डॉ. सुनील अवचार, किशोर मेढे (संपादक) व नितीन कोतापल्ले (सायन पब्लिकेशन प्रायव्हेट लिमिटेड) हे उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमास जनतेने आवर्जून उपस्थित रहावे असे आवाहन केंद्राचे सरचिटणीस चंद्रकांत बच्छाव यांनी केले आहे.
