पालिवाल समाजातील मान्यवरांचा सन्मान

एनीग्लो आयुर्वेदिक सौंदर्यप्रसाधन उत्पादनांचे लाँचिंग

ठाणे : ठाणे शहरासह संपूर्ण भारतभर सामाजिक उपक्रम राबविणाऱ्या नॅप फाऊंडेशच्या वतीने रविवारी उद्योगक्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या देशभरातील पालिवाल समाजातील ज्येष्ठ उद्योजक आणि तरुण उद्योजकांचा सन्मान करण्यात आला. यावेळी नॅप फाऊंडेशच्या संस्थापक अध्यक्षा निकीता पालिवाल यांच्या `दादीकी पोटली’ मधून निर्मिती झालेल्या एनीग्लो आयुर्वेदिक सौंदर्य प्रसाधन उत्पादनांचे मान्यवरांच्या हस्ते लाँचिंग करण्यात आले.

महेश भवन, कासारवडवली, ठाणे येथे संपन्न झालेल्या या कार्यक्रमाला देशभरातून संस्थेचे प्रतिनिधी उपस्थित होते. प्रमुख पाहूणे म्हणून आमदार संजय केळकर, डिम्पी बजाज (नागपुर युवती अध्यक्ष भाजपा), श्रीमती शर्मिला, श्री. यशपाल (राष्ट्रीय कार्यकारीणी सदस्य) श्री. मोहन, श्री.उमेश, श्री. आलोक, श्रीमती सीमा, श्री.दिनेश, श्रीमती अंजना, श्री.राहुल आदी मान्यवर उपस्थित हाते. ज्येष्ठ उद्योजक श्री. बाबूलाल (कोटा) यांना जीवनगौरव पुरस्काराने गौरविण्यात आले.

नव उद्योजक पुरस्काराने राशि पालीवाल (चंडीगढ), गोपाल (वर्धा), जया (फतहनगर), मयूर भट्ट (भावनगर, गुजरात), भावना (दिल्ली) यांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.

महिला सक्षमीकरण्याच्या उद्देशाने महिलांना स्वयंरोजगार मिळावा म्हणून नॅप फाऊंडेशच्या माध्यमातून दादीकी पोटली उपक्रमांतर्गत आयुर्वेदिक सौंदर्य प्रसाधने बनविण्यात आली आहेत. त्याचे लाँचिंग आमदार संजय केळकर यांच्या हस्ते करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *