एकाचा दुर्दैवी मृत्यू
कल्याण : मौजेवाडी येथील मलंगड गडावर सुलतान बाबा दर्ग्या जवळ आज एक भीषण दुर्घटना घडली. यात एका इसमाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. सकाळी 6 वाजताच्या सुमारास सुलतान बाबा दर्ग्या जवळ वस्तव्यास असणाऱ्या गुलाम बादशाह सय्यद यांच्या राहत्या घरावर महाकाय दगड कोसळला. यात गुलाम बादशाह सय्यद वय 35 व त्यांची पत्नी समीरा गुलाम सय्यद वय 30 या गंभीर जखमी झाले. पुढे त्यांना सेंट्रल हॉस्पिटल उल्हासनगर येथे त्यांना उपचारासाठी नेण्यात आले.
मात्र दहा वाजता सेंट्रल हॉस्पिटल उल्हासनगर येथील डॉक्टरांनी गुलाम बादशाह सय्यद यांना मयत घोषित केले.यामुळे परिसरात शोककाळा पसरली आहे.
