विधानसभेत शिंदें इतक्याच जागा राष्ट्रवादीला हव्यात

मुंबई : लोकसभा निवडणूकीत पराभवाचा दणका बसल्यानंतर आता भाजपाप्रणीत महायुतीत पुन्हा धुसफूस सुरू झाली आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्रीछगन भुजबळ यांनी पुन्हा एकदा ठिणगी टाकली आहे.

“आम्ही मागच्या वेळेस म्हटलं की ८० जागा आम्हाला कमीत कमी मिळाल्या पाहिजेत. तर हे ताबोडतोब माझ्या विरोधात बोलू लागले. मी म्हटलं बर बबा नाही बोलत. जागा वाटपाचे गुऱ्हाळ शेवटपर्यंत चालवून तुमचा फायदा होणार नाही. याचा लवकर निपटारा करायला पाहिजे. उमेदवार काय करायचे नंतर ठरवा. भाजप मोठा पक्ष आहे, मोठा भाऊ आहे, मान्य आहे. पण आम्ही सुद्धा सांगितलं की, आमचे जेवढे आमदार आहेत, तेवढेच शिंदेंचे आहेत. त्यामुळेत्यांना जेवढ्या जागा मिळतील तेवढ्याच आम्हाला मिळायलाहव्यात” असे छगन भुजबळ म्हणाले. मुंबईत अजित पवारांच्याराष्ट्रवादीचा वर्धापनदिन साजरा करण्यात आला. यावेळीछगन भुजबळ बोलत होते.

आता विधानसभेची निवडणूक आहे, म्हणजे संविधानाचा प्रश्न नाही

छगन भुजबळ म्हणाले, आता विधानसभेची निवडणूक आहे, म्हणजे संविधानाचा प्रश्न नाही. संविधान बदलाचे कामहोणार नाही. तो लोकसभेचा मुद्दा होता, आता विधानसभेलाचालणार नाही. आपले मतदार दलित, ओबीसी, मराठा हेआपले मतदार आपल्याला परत मिळवावे लागतील. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून या गोष्टी आपल्याला कराव्याचलागतील. त्यांना विश्वास द्यावा लागेल. युपीमध्येहीसंविधानाबाबत प्रचार झाला, त्यामुळे महायुतीच्या जागाकमी आल्या. महायुतीला ठेच लागली आहे, हे नाकारुनचालणार नाही. लोकभा निवडणूकीत महायुतीला ठेच लागलीहे नाकारुन चालत नाही. दगडधोंडे बाजूला करावे लागतील. मुंबईत प्रत्येक ठिकाणी विकासकामे सुरू आहेत. ⁠विकासविकास आणि विकास मात्र मुंबईत किती निवडून आलेआहेत. लाखो कोटी खर्च केले, मात्र आपले उमेदवार निवडूनआले नाहीत, असंही भुजबळ यांनी सांगितलं.

मुस्लीम समाज, दलित समाज आपल्याला सोडून बाजूला झाले

पुढे बोलताना छगन भुजबळ म्हणाले, मुस्लीम समाज, दलितसमाज आपल्याला सोडून बाजूला झाले. 400 पार म्हणालो, त्याचा प्रचार असा झाला की, संविधान बदललं जाणार आहे. मोदींनी खुलासा केला, पण तोपर्यंत लोकांना वाटलं 400 पारम्हणजे आपला बेडा पार झाला. दलित, मुस्लीम समाजआपल्यापासून गेला तर आपलं काय? संविधान बदलणारम्हणजे आपलं आरक्षण जाणार असंही लोकांच्या डोक्यातआलं. आपलं नुकसान करण्यासाठी विरोधी पक्ष प्रचारकरणार आहे. आपण त्यामध्ये सुधारणा करु शकलो नाही, हेसत्य आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *