मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अमोल काळे यांचे निधन

मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अमोल काळे यांचे हृदयविकरच्या झटक्याने काल न्यूयॉर्क, अमेरिका येथे निधन झालं. रविवारी रात्री एमसीएच्या पदाधीकाऱ्यांसाह न्यूयॉर्कमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातला सामना बघायला ते गेले होते. पण काल दुपारी त्यांच्या निधनाची बातमी सोशल मीडियामध्ये वायरल झाली.

ऑक्टोबर 2022 मध्ये संदीप पाटील यांचा पराभव करत अमोल काळे यांनी मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्ष पदाची धुरा सांभाळली होती. त्यानंतर त्यांनी घेतलेले अनेक निर्णय चर्चेचा विषय ठरले होते. त्यात मुंबईच्या वारिष्ठ खेळाडूंची मॅच फी ही दुप्पट करण्याच्या त्यांच्या निर्णयाचेही सगळ्यांनी कौतुक केले होते. अमोल काळे हे मुळचे नागपूरचे होते आणि देवेंद्र फडणवीस यांच्या निकटवर्तीय मानले जात होते. २०१४ मध्ये महायुतीचे सरकार सत्तेत आल्यानंतर फडणविसांचे अत्यंत विश्वासू म्हणून काळेंकडे पहिलं जात होतं. देवेंद्र फडणवीस हे नागपूरचे महापौर असताना अमोल काळे हे भाजपचे वॉर्ड अध्यक्ष होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *