मुंबई : श्री दत्तराज चारिटेबल ट्रस्टच्यावतीने हॉटेल मंगलम, नरसोबावाडी, कोल्हापूर येथे सुरु असलेल्या कै. अशोक पुजारी यांच्या स्मरणार्थ आयोजित करण्यात आलेल्या ८ व्या राज्य मानांकन कॅरम स्पर्धेतील पुरुष एकेरीच्या उप उपांत्य सामन्यात माजी राष्ट्रीय विजेत्या मुंबईच्या संजय मांडेने फार्मात असलेल्या मुंबईच्या विकास धारियाला १९-१४, २५-६ असे सरळ दोन सेटमध्ये हरवून उपांत्य फेरी गाठली. महिलांच्या उप उपांत्य सामन्यात रत्नागिरीच्या केशर निर्गुणने मुंबईच्या नेहा कुमारीला २२-१६, १८-८ असे हरवून आगेकूच केली.
पुरुष एकेरी उप उपांत्य फेरीचे इतर निकाल पुढीलप्रमाणे.
रहिम खान ( पुणे ) वि वि अभिजित त्रिपणकर ( पुणे ) १४-१०, २५-५
प्रशांत मोरे ( मुंबई ) वि वि पंकज पवार ( मुंबई ) २१-६, ०-२३, २५-६
संदीप दिवे ( मुंबई उपनगर ) वि वि झैद अहमद फारुकी ( ठाणे ) २५-२१, २४-११
महिला एकेरी उप उपांत्य फेरीचे इतर निकाल पुढीलप्रमाणे.
काजल कुमारी ( मुंबई ) वि वि अंजली सिरीपुरम ( मुंबई ) २४-२२, २४-१९
आकांक्षा कदम ( रत्नागिरी ) वि वि उर्मिला शेंडगे ( मुंबई ) २५-०, २५-२१
प्राजक्ता नारायणकर ( मुंबई उपनगर ) वि विप्रिती खेडेकर ( मुंबई ) २५-११, २४-७
