मुंबई : लोकसभा निवडणूकीत संविधान बदलणार हे सांगण्यात आलं, चारशे पारचा नारा देण्यात आला, लोकांनी हे डोक्यात ठेवलं आणि गडबड झाली त्यात कांद्याच्या निर्यातीवरून झालेला घोळ होताच या कांद्याने आम्हाला रडवले अशी कबुली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शेती पिक किमान आधारभूत किंमत निश्चितीसाठी केंद्रीय कृषी मूल्य व किंमत आयोगाची बैठक पार पडली. यावेळी एकनाथ शिंदे बोलत होते.

“एक शेतकऱ्याचा मुलगा म्हणून शेतकऱ्यांचे विषय हाताळण्यासाठी नेहमी पुढे असतो. मी गावी जातो आणि शेती सुद्धा करतो. काही लोक म्हणतात की मुख्यमंत्री हेलिकॉप्टरने जाऊन शेती करतात, पण वेळेचं बचत व्हावं यासाठी मी हेलिकॉप्टरने जातो. बांबूच्या शेतीसाठी सरकारने अनुदान देण्याचे ठरवलेलं आहे.  तापमान कमी करायचं असेल तर मोठ्या प्रमाणात झाडांची लागवड केली पाहिजे.  २०२२ ला बांबू लावला होता. यावेळी बांबू लावले नसते तर आज ही बैठकीला या ठिकाणी हजर नसतो.

एकनाथ शिंदे म्हणाले, मराठवाडा विदर्भात सोयाबीन आणि कापूस त्यामुळे थोडा त्रास झाला. या सर्वांसाठी मी प्रावधान केलं होतं परंतु आचारसंहिता लागल्याने त्याचं वाटप करता आलं नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत याबाबत चर्चा केलेली आहे. काही भागात विरोधात निगेटिव्ह सेट केल्यामुळे आम्हाला नुकसान झालं. संविधान बदलणार हे सांगण्यात आलं 400 पार चा नारा सुद्धा देण्यात आला हे लोकांनी डोक्यात ठेवलं आणि गडबड झाली. शेतकऱ्यांना दुःखी ठेवून कोणी सुखी होणार नाही. त्यामुळे आमचे सरकार शेतकऱ्यांसाठी सर्व काही करत आहे. लवकर केंद्रीय कृषिमंत्री यांची वेळ घेऊन राज्यातल्या शेतकऱ्यांच्या समस्या मांडू, असे आश्वासनही शिंदे यांनी दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *