मुंबई : १० जून वाढदिवसाचे औचित्य साधून टाटा कॅन्सर हॉस्पिटल परळ येथील रुग्ण व नातेवाईक यांच्यासाठी स्वामी समर्थ संस्था ठाणे व बृहन्मुंबई पोलिस यांच्या सहकार्याने समाजसेवक ठाणे भाजपा उपाध्यक्ष डॉ.राजेश मढवी यांचा जन्मदिवसा निमित्त अन्नदान करून साजरा करण्यात आला. त्याचबरोबर ठाणे नौपाडा दरवर्षी प्रमाणे गरीब गरजू विद्यार्थ्यांसाठी वीस हजार वह्या, शैक्षणिक साहित्य यांचे वाटप.
ज्येष्ठ शिक्षक, विश्वस्त सरस्वती मराठी शाळा सन्माननीय सुरेंद्र दिघे सरांच्या शुभहस्ते करण्यात आले.तसेच वाढदिवस शुभेच्छा देण्यासाठी मा.आमदार संजय केळकर,खासदार नरेश मस्के, परिवहन सभापती विलास जोशी, भाजपा शहर अध्यक्ष संजय वाघुले, मा. नगरसेवक नारायण पवार, सुनेश जोशी, जयेंद्र कोळी, राजेश मोरे,मा. नगरसेविका मृणाल पेंडसे, असे मान्यवर उपस्थित होते. त्याचबरोबर ब्राह्मण विद्यालयाचे विश्वस्त केदार जोशी यांचाही वाढदिवस साजरा करण्यात आला. सर्व मान्यवरांचे मा. नगसेविका सौ. प्रतिभा मढवी व डॉ. राजेश मढवी यांनी आभार मानले.
०००००