स्वाती घोसाळकर
मुंबई: लोकसभा निवडणूक संपून देशात नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले आहेत. पण लोकसभेच्या या निकालानंतर महाराष्ट्रात मात्र भाजपाप्रणीत महायुतीचा पुरता निकाल लागल्याचे चित्र आहे. लोकसभेतील निकालानुसार विधानसभा क्षेत्रातील मतांची आघाडी विचारात घेतली तर २८८ विधान सभेच्या जागापैकी तब्बल १५३ जागा महाविकास आघाडी जिंकू शकते. विधानसभेत बहुमतासाठी १४५ जागांची गरज आहे. थोडक्यात लोकसभेच्या निकालानुसार आता विधानसभेची निवडणूक झाली तर काँग्रेस, राष्ट्रवादी आणि ठाकरेंची शिवसेना यांचे सरकार राज्यात येऊ शकते. अवघ्या तीन महिन्यात महाराष्ट्रात विधानसभेची निवडणूक होणार असल्याने महायुतीची धाकधूक वाढली आहे. उलट लोकसभेतील यशामुळे महाविकास आघाडी फ्रंटफुटवर आक्रमकपणे खेळताना दिसत आहे.
लोकसभेच्या निवडणूकीत महायुतीला सर्वाधिक फटका हा विदर्भात बसला. त्यामुळे आता विधानसभेच्या क्षेत्रानुसार विदर्भात महाविकास आघाडीनी 42 मतदारसंघात आघाडी घेतली आहे. तर महायुतीला जेमतेम १९ मतदार संघावर वरचष्मा राखता आला आहे.
विधानसभा मतदारसंघनिहाय आघाडी
एकूण जागा – २८८
बहुमताचा आकडा – १४५
मविआ – १५३
महायुती – १३०
इतर – ५
विदर्भ – एकूण जागा – ६२
मविआ – ४२
महायुती – १९
मराठवाडा – एकूण जागा- ४८
मविआ – ३४
महायुती – १२
एमआयएम- ०२
मुंबई– ३६
मविआ – २०
महायुती – १६
पश्चिम महाराष्ट्र – ५९
मविआ – ३३
महायुती – २६
उत्तर महाराष्ट्र – ४८
मविआ – १९
महायुती – २९
कोकण- १२
मविआ – ५
महायुती – ७