नागपुर : मणिपूर दंगलीवरून सरसंघचालक मोहन भागवत यांनी भाजपाची कानउघडणी केली आहे. ईशान्येकडील मणिपूर हे राज्य गेल्या एक वर्षापासून हिंसाचाराच्या आगीत जळत आहे. मणीपूर जळत असतानाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तेथे जाऊन शांतता प्रस्थापित करण्याचे आवाहन केले नसल्यामुळे विरोधकांनी टीकेच रान उठवले होते. आता त्यात सरसंघचालकांचीही भर पडली आहे. मोहन भागवत म्हणाले, “मणिपूर वर्षभरापासून शांततेची वाट पाहत आहे. याचा प्राधान्याने विचार व्हायला हवा. मोहन भागवत यांच्या या विधानाकडे केंद्रातील मोदी सरकारसाठी मोठा सुचक इशारा म्हणून पाहिले जात आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्ता विकास वर्गाच्या समारोप कार्यक्रमात मोहन भागवत म्हणाले, “यावेळीही आम्ही जनमत जागृत करण्याचे काम केले आहे. खरा सेवक हा शिष्टाचाराचे पालन करतो. आपले कर्तव्य कुशलतेने करणे आवश्यक आहे. भागवत म्हणाले, “काम करा, पण मी करून दाखवले याचा अभिमान बाळगू नये. जो हे करतो तोच खरा सेवक आहे, असंही भागवत म्हणाले.
मोहन भागवत म्हणाले, देवाने प्रत्येकाला निर्माण केले आहे. देवाने निर्माण केलेल्या विश्वाप्रती कोणाच्याही भावना कशा असाव्यात. हा विचार करण्यासारखा विषय आहे. विचार करून काळाच्या प्रवाहात आलेल्या विकृती दूर करून, हे जाणून मते वेगळे होऊ शकते. परंतु आपण या देशातील लोकांना आपले बांधव समजले पाहिजे, असंही भागवत म्हणाले.
मोहन भागवत म्हणाले, “संघशाखेत येणारी व्यक्ती आनंदाने असे करते. आपण जे काही करत आहोत त्यातून आपल्याला काय फायदा होतोय याचीही त्याला पर्वा नसते. १०-१२ वर्षांनी जेव्हा तो मागे वळून पाहतो तेव्हा संघ स्वत:ला परिपक्व आणि बदलत आहे, हेच आमचे कर्तव्य आहे.