मुंबई पदवीधर मतदारसंघ निवडणूक

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, नेते आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते विमोचन

मुंबई: शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते आणि मुंबई पदवीधर मतदारसंघातील उमेदवार आमदार ॲड अनिल परब यांच्या पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुक संकल्पपत्राचे विमोचन शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे आणि शिवसेना नेते आणि युवासेना प्रमुख आदित्य साहेब ठाकरे यांच्या हस्ते उद्या बुधवारी दिनांक १२ जून २०२४ रोजी होणार आहे. हा कार्यक्रम मातोश्री येथे उद्या दुपारी १२ वाजता होणार आहे. याद्वारे परब हे त्यांच्या पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ करणार आहेत.

या संकल्पपत्राच्या माध्यमातून माझा आजपर्यंतचा राजकीय प्रवास, केलेली विविध विकास कामे, सामाजिक कार्यातील सहभाग यासह पदवीधर मतदारांसाठीचे संकल्प यामध्ये मांडले आहेत. येणाऱ्या काळात पदवीधर युवकांच्या अनेक महत्वाच्या मुद्द्यांवर आवाज उठविणार आहे आणि पदवीधर युवकांचा बुलंद आवाज बनून काम करणार असल्याचे परब यांनी याप्रसंगी सांगितले.

गेली १८ वर्षे विधान परिषदेत शिवसेनेचे आमदार असलेले ॲड अनिल परब यावेळी मुंबई पदवीधर मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. परब यांनी ३ जून रोजी शिवसेना नेते आणि महाविकास आघाडीतील नेत्यांच्या उपस्थित उमेदवारी अर्ज भरला आहे.

निवडणूक आयोगाने मुंबई आणि कोकण पदवीधर आणि नाशिक आणि मुंबई शिक्षक मतदारसंघ या चार विधान परिषदेच्या जागांसाठी निवडणुका जाहीर केल्या आहेत. या मतदारसंघासाठी २६ जून २०२४ रोजी मतदान होणार आहे.

परब यांनी ही निवडणूक मोठ्या मताधिक्याने जिंकण्याचा विश्वास यापूर्वी व्यक्त केला आहे. महामुंबईमध्ये शिवसैनिकांनी ज्याप्रमाणे मतदार नोंदणी केली आहे. तसेच, मी प्रत्यके लढाईत पूर्ण ताकतीनिशी उतरतो. प्रत्येक लढाई हि माझ्या, पक्षाच्या, शिवैनिकांच्या ताकतीवर आणि बाळासाहेबांच्या आशिर्वादावर लढत असतो. त्यामुळे समोर प्रतिस्पर्धी कोण, तो किती तुल्यबळ आहे, याची तमा न बाळगता शिवसैनिक ताकतीने लढत असतो, असेही त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *