मुंबई : मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या सौजन्याने व मीरा-भाईंदर कुस्तीगीर संघ संचालित श्री गणेश आखाडा भाईंदरचे सर्वेसर्वा वस्ताद गुरुवर्य वसंतराव पाटील यांनी कुस्ती क्षेत्रात तीन दशकांपेक्षा जास्त काळ दिलेल्या भरीव योगदानाबद्दलसांगली येथील ईगल फाउंडेशनने त्यांचा २०२४ चा राष्ट्रीय गरुड झेप पुरस्कार देऊन नुकताच गौरव केला. डॉक्टर अण्णासाहेब डांगे शैक्षणिक संकुल आष्टा, जिल्हा सांगली येथे झालेल्या ईगल फाउंडेशनच्या वर्धापन दिन सोहळ्यात पाटील यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. आमदार रामहरी रुपनर, सुर्यकांत तोडकर विश्वस्त डॉ. वाय. पाटील शिक्षण समूह , प्रा. कृष्ण आल्दर सदस्य भारतीय अन्न महामंडळ , श्रीमती निशादेवी बंडगर उपसंचालक समाज कल्याण आयुक्तालय, पुणे या मान्यवरांच्या उपस्थित प्रदान करण्यात आला.
ईगल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष विलासराव कोळेकर यांनी कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन केले होते. अन्य पुरस्कार विजेत्यांमध्ये होळकर विद्यापीठ सोलापूरचे सहाय्यक कुलसचिव डॉ. शिवाजी शिंदे, समाज कल्याण आयुक्तालय, पुणे, उप संचालक श्रीमती निशादेवी बंडगर (वाघमोडे), दैनिक स्वराज्य तोरणचे संपादक डॉ. किशोर पाटील, आर एस पी अधिकारी डॉ. मनिलाल शिंपी, डॉ. मीना श्रीवास्तव, पत्रकार सुनिल पाटील, अमोल पांढरे, बाळासाहेब कोळेकर, अविनाश रामचंद्र यांचादेखील समावेश आहे. वसंतराव पाटील यांना हा पुरस्कार मिळाल्याबद्दल श्री गणेश आखाड्यातील सर्व कुस्तीपटू, प्रशिक्षक आणि पालकवर्गानी त्यांचे खास अभिनंदन केले आहे.
