कल्याण व भिवंडीतील मागासवर्गीय मुलांमुलींचे

ठाणे :- इयत्ता 8 वी पासून पुढील शिक्षण घेणाऱ्या व महाविद्यालयीन विभागातील प्रथम वर्षात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षाकरिता महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत चालविण्यात येणाऱ्या भिवंडी व कल्याण येथील मागासवर्गीय मुलामुलींचे शासकीय वसतीगृहात मोफत प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे. वसतिगृह कार्यालयात प्रवेश अर्ज मोफत उपलब्ध आहेत. इच्छुक विद्यार्थ्यांनी कामकाजाच्या दिवशी कार्यालयीन वेळेत प्रवेशासाठी संपर्क साधावा, असे आवाहन वसतीगृहांचे गृहपाल प्र. ना. मडावी यांनी केले आहे.
वसतीगृहात प्रवेशासाठी अर्जासोबत लागणारी प्रमाणपत्रे (सर्व छायांकीत प्रती)-
1. गुणपत्रिका, 2. शाळा सोडल्याचा दाखला, 3. जातीचा दाखला (सक्षम प्राधिकारी), 4. उत्पन्नाचा दाखला (सक्षम प्राधिकारी),  5. रहिवासी दाखला (सरपंच/तलाठी/नगरसेवक), 6. आधार कार्ड तसेच प्रवेश घेतेवेळी खालील कागदपत्रे आवश्यक आहेत.
1. शाळा / महाविद्यालयाचे बोनाफाईड प्रमाणपत्र, 2. आधार संलग्न बँक खात्याच्या पासबुकच्या पहिल्या पानाची छायाकिंत प्रत, 3. वैद्यकीय प्रमाणपत्र 4. पासपोर्ट साईज फोटो  5.  10 रुपयांचे कोर्ट फी टिकीट लावून वसतिगृह नियमाचा करारनामा करुन द्यावे लागेल.
अधिक माहितीसाठी संपर्क
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलांचे शासकीय वसतिगृह, भिवंडी, मानसरोवर शॉपीग कॉम्पलेक्स, पहिला माळा, भिवंडी, (संपर्क क्र 9767612897) मागास तथा आर्थिकदृष्ट्या मागास मुलींचे शासकीय वसतिगृह, भिवंडी, मानसरोवर शाँपिग कॉम्प्लेक्स, दुसरा माळा भिवंडी.मुलांचे शासकीय वसतिगृह (गुणवंत), कल्याण, गौरी अपार्टमेन्ट, पाचवा माळा, बेहतुरकर पाडा, कल्याण पश्चिम, (संपर्क क्र. ९७६७६१२८९७). या वसतिगृहात वर्ग 11 ते 12 व पॉलिटेक्निक प्रथम / आय. टी. आय मध्ये प्रवेशित विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येईल. (हे वसतिगृह शासकीय इमारत, गौरीपाडा, कल्याण, येथे स्थलांतरित करण्यात येत आहे.)
000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *