२.२ लाख घन मीटरपेक्षा जास्त पावसाच्या पाण्याचा होणार पुनर्भरणा
रायगड जिल्ह्यातील उपक्रम
पनवेल (प्रतिनिधी) टाटा स्टीलने जागतिक पर्यावरण दिनी रायगड जिल्ह्यातील खोपोलीमध्ये पावसाच्या पाण्याच्या साठवणीच्या नवीन प्रकल्पाचा शुभारंभ केला आणि प्रकल्पाच्या ठिकाणी १५०० पेक्षा जास्त झाडे लावून सस्टेनेबिलिटी महिन्याची सुरुवात साजरी केली. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ रायगडचे क्षेत्रीय अधिकारी जयंत हजारे आणि क्षेत्र अधिकारी मीना पवार, खोपोली व होसूरचे कार्यकारी प्लान्ट प्रमुख कपिल मोदी आणि सावरोली गावाचे सरपंच संतोष गणेश बैलमारे हे यावेळी उपस्थित होते.
पावसाच्या पाण्याची साठवण करणाऱ्या या नवीन प्रकल्पामुळे प्लान्टची ताज्या पाण्याची आवश्यकता ५० हजार घन मीटरने कमी होईल. या प्रकल्पामध्ये ९ पुनर्भरण खड्ड्यांद्वारे २.२ लाख घन मीटरपेक्षा जास्त पावसाच्या पाण्याचा जलचरामध्ये पुनर्भरणा केला जाण्याची अपेक्षा आहे.सह्याद्री पर्वतरांगांच्या पायथ्याशी वसलेले खोपोली हे रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील एक औद्योगिक शहर आहे. इथे दरवर्षी १८५०-३९१४ मिलीमीटर पाऊस होतो, त्यामुळे महाराष्ट्रातील सुपीक पाणलोट क्षेत्रांमध्ये खोपोलीचा समावेश होतो. टाटा स्टीलमध्ये जून हा सस्टेनेबिलिटी महिना म्हणून साजरा केला जातो. या निमित्ताने अनेक वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार असून, यामध्ये कर्मचाऱ्यांसाठी विविध स्पर्धा, जागरूकता सत्रे, वृक्षारोपण मोहीम इत्यादींचा समावेश असणार आहे.
0000