अशोक लेलँड च्या कार्यालयात चालक, मालकांचा ठिय्या

ठाणे :  मोठ्या प्रमाणात प्रवाशी वाहतूक करणाऱ्या अशोक लेलँडच्या बसगाड्या धोकादायक असून या गाड्या अचानक बंद पडत आहेत. शिवाय, भरधाव वेगात असताना अनेक भाग नादुरुस्त होत आहेत. त्यामुळे प्रवाशांच्या जीविताला धोका निर्माण झाला असून याबाबत  करूनही संबधीतांकडून कार्यवाही केली जात नसल्याने मुंबई बस मालक संघटनेने आज कंपनीच्या माजिवडा येथील कार्यालयावर धडक दिली. वारंवार नादुरुस्त होणाऱ्या सुमारे ६१ नवीन बस गाड्या कंपनीने पुन्हा ताब्यात घ्याव्या अशी मागणी यावेळी करण्यात आली.
बस चालत असताना फ्रंट व्हील हब क्रॅक होणे, व्हील डिस्क तुटणे,  क्लच / प्रेशर प्लेट / रिलीझ बेरिंग,  क्लच सिलेंडर / डिझेल पाईप तुटणे,  सायलेन्सर पाईप फुटणे ,  पुरवठा करणे करणारे पाईप फुटणे,  गियर बॉक्स –  ब्रेक लायनर समस्या  अशा अनेक  अडचणी नव्या कोऱ्या बसगाड्यांमध्ये आहेत. अशोक लेलँडने विकलेल्या बस या सदोष असल्याने प्रवाशी आणि वाहन चालक, सहाय्य्क यांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. या बसगाड्या  बिघाड होऊन बंद  पडत आहेत.  या बसगाड्यांमधील  अनेक भाग अचानक नादुरुस्त होत असल्याने बसला अपघात होण्याची शक्यता बळावली आहे. खासगी वाहतूक करणाऱ्या या बस गाड्यांमध्ये प्रवास करणाऱ्यामध्ये लहान मुले, लहान मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांचा समावेश असतो. मात्र, अचानक गाड्या बंद पडत असल्याने प्रवाशांना  रस्त्यावर तासनतास अडकून पडावे लागत आहे.  वारंवार बिघाडामुळे बस मालकांचेही आर्थिक नुकसान होत आहे. शिवाय, प्रवाशांकडून चालकांना  घडत आहेत. याबाबत अनेकवेळा बस मालकांनी संबंधितांना कळवूनदेखील कोणत्याही प्रकारची कार्यवाही केली जात नाही. अशोक लेलँड ही कंपनी मोठ्या अपघाताची वाट पहात आहे का, असा सवाल करीत मुंबई बस मालक संघटनेने माजिवडा येथे हे आंदोलन केले.यावेळी,  धावत्या बसमधील हब तुटल्यामुळे बसचे होणारे नुकसान कोण सहन करणार?  व्यवसायातील तोटा कोण सहन करणार ?  प्रवासादरम्यान आणि भविष्यातील प्रवासात वाहन निकामी झाल्यास प्रवाशांना परतावा, कर, विमा, बँक दायित्व, ब्रेकडाउनमुळे भविष्यातील बुकिंगवर परिणाम यावर उपाययोजना कोण करणार ? ब्रेकडाऊन दरम्यान पोलिस आणि टोइंग चार्जेसचे नुकसान कोण  करणार  ?  वॉरंटीमध्ये ब्रेकडाउन दरम्यान आम्ही किमीचा विचार करणार आहोत का?  कर्मचाऱ्यांचे पगार आणि त्यांच्या निवासाचा खर्च कोण करणार?प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण होण्यास कोण जबाबदार आहे?  असे प्रश्न मुंबई बस मालक संघटनेने उपस्थित केले असून या ६१ नवीन बस गाड्या कंपनीने पुन्हा ताब्यात घ्याव्यात,  अशी मागणी यावेळी करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *