मुंबई : अण्णा हजारे बराच वेळ शांत होते. मागचे अनेक वर्षे त्यांचे मौन होते. आता बोलतायत हे आश्चर्य आहे. ते आता अजित पवार यांच्यावर का बोलतात? ते त्यांच्या सहकाऱ्यांनी शोधावं. त्या आरोपमध्ये आतापर्यंत काही मिळाला नाही. त्यांचा बोलावता धनी नक्की कोण? असा सवाल जयंत पाटील यांनी केला.
छगन भुजबळांबाबत बोलताना जयंत पाटील म्हणाले, त्यांच्या पक्षाचं विषय आहे. त्यांचे पक्ष श्रेष्ठी काय ते ठरवतील.
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. सरकार त्यावर विचार करणार का? त्यांची मागणी प्रथम पाहावी. आमचं सरकार आलं तर त्यांची मराठा आरक्षणाची मागणी पाहिली करून घेऊ, असा शब्द शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिला आहे.
फक्त दोन आठवड्याचा अधिवेशन करण्याची डाव दिसतोय. आणि म्हणूनच अधिकचा आठवडा वाढावा ही विनंती आहे. अधिकाचे दिवस वाढवावे. न्याय मागण्यासाठी दिवस मिळावे. शेवटचे अधिवेशन आहे, त्यामुळे सगळ्यांना बोलण्याची संधी मिळावी, अशी मागणी जयंत पाटील यांनी केली आहे.
