रत्नागिरी- कोकणातून महायुतीला तडीपार करा म्हणणाऱ्या शिवसेनेला मी कोकणातून संपवले असेअसे धक्कादायक विधान माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपाचे खासदार नारायण राणे यांनी केलं आहे.
खासदार नारायण राणे यांनी शनिवारी कुडाळ येथे पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी शिवसेना संपवल्याचा दावा केला. आता यापुढे कोणाला थारा देणार नाही. आमच्या समोर कोणी आडवे कोण आले तर, त्यांना त्यांची जागा दाखवून देऊ, असंही नारायण राणे यांनी म्हटलं आहे.
“येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत रत्नागिरी- सिंधुदुर्गमधील सर्व जागांवर भाजपचाच आमदार असेल त्या दृष्टीने आपण काम करणार आहोत. त्यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे. रत्नागिरी- सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात मिळालेला विजय हा जनतेचा विजय आहे. मी मात्र निमित्त आहे,” असं नारायण राणे यांनी म्हटलं आहे.
