नवी दिल्ली : लोकसभा अध्यक्षपदी भाजपाचा खासदार जर निवडून आला तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह ही जोडी नितीश कुमार आणि चंद्रबाबू नायडू यांचा पक्ष फोडतील असा दावा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी आज केलाय. केलाय.
लोकसभा अध्यक्षपद महत्त्वाचं आहे, चंद्राबाबू नायडूंना लोकसभा अध्यक्षपदासाठी समर्थन देण्याचा विचार करु. लोकसभेचे अध्यक्ष पद राष्ट्रीय लोकशाही आघाडीतल्या घटक पक्षाला मिळालं नाही तर अमित शहा आणि नरेंद्र मोदी हे तेलगू देशम चंद्रबाबू नायडूंचा पक्ष आणि नितेश कुमारचा पक्ष हे फोडल्याशिवाय राहणार नाही, असे राऊत म्हणाले. भारतीय जनता पक्षाची परंपरा आहे ज्याचे खावे मीठ त्याची मारावी नीट ही भाजपची परंपरा आहे, असा हल्लाबोल देखील राऊतांनी केला.
लोकसभेचे अध्यक्ष पद हे अत्यंत महत्त्वाचा असते. महाराष्ट्राच्या विधानसभेत राहुल नार्वेकर हे भारतीय जनता पक्षांचे पॉलिटिकल एजंट असल्याप्रमाणे वागले. त्यांच्यामुळे शिवसेना घटनाबाह्य पद्धतीने फुटल्याचं जाहीर करण्यात आले. असा आरोपही राऊत यांनी केला. राहुल नार्वेकर अत्यंत घटनाबाह्य पद्धतीने निकाल दिला तसाच निकाल उद्या लोकसभेत भाजपचा जर अध्यक्ष असेल तर दिला जाऊ शकतो. असेही राऊत म्हणाले.
