माथेरान : माथेरान जेष्ठ नागरिक संस्थेची विशेष सभा करसनदास मुळशी वाचनालय येथे उत्साहात पार पडली संस्थेच्या अध्यक्षपदी रहेमान शेख अध्यक्ष पदी सर्वानुमते निवड करण्यात आली तर उपाध्यक्ष पदावरअरविंद रांजणे ,सचिव म्हणून अनंत शेलार , खजिनदार रजनी कदम , सहसचिव प्रकाश सुतार (पिके) व अशोक पवार यांची सह खजिनदार पदी सर्वानुमते निवड करण्यात आली.
जेष्ठ नागरिक संघटनेला त्यांच्या काही बैठका अथवा विचारविनिमय करण्यासाठी नगरपरिषदेच्या माध्यमातून नगरपरिषदेच्या वाचनालयातील एक खोली वापरण्याकरिता दिलेली आहे तिथे वेळेनुसार सर्व जेष्ठ नागरिक एकत्रित येऊन आपल्या प्रश्नांची उकल करत असतात.
