ठाणे : तंबाखू मुक्त शाळा, लेट्स स्पिक इंग्लिश, शाळा दुरुस्ती संदर्भात ८ कोटी निधी सेवाभावी संस्थांकडून तालुक्यात उपलब्ध करून शाळेची गुणवत्ता वाढवली आहे, यामुळे या सर्व कामांना मुख्य कार्यकारी अधिकारी छायादेवी शिसोदे यांनी शुभेच्छा दिल्या.
गटशिक्षणाधिकारी भाऊसाहेब चव्हाण यांनी शिक्षणविभागाची माहिती दिली. तालुक्यात ५७३ शाळा असून समग्र शिक्षा अंतर्गत पाठ्यपुस्तिका वाटप करण्यात आले आहे. शाळा प्रवेश उत्सव मंगळवारी करण्यात येणार आहे. विशेष मोहिम राबवून शाळाबाह्य मुले ३० जून पर्यंत शोधमोहीम करण्यात येईल. सावरोली येथिल प्राथमिक शाळेत २ हजार सिडबॉल तयार केले आहे.तंबाखू मुक्त शाळा, लेट्स स्पिक इंग्लिश, शाळा दुरुस्ती संदर्भात ८ कोटी निधी सेवाभावी संस्थांकडून तालुक्यात उपलब्ध करून शाळेची गुणवत्ता वाढवली आहे. या सर्व कामामुळे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी शुभेच्छा दिल्या. शहापूर तालुक्यातील कामकाजची माहिती घेऊन योग्य मार्गदर्शन करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी छायादेवी शिसोदे यांनी पंचायत समिती शहापूर येथे भेट देऊन विविध कामांचा आज (दि. १४ जून २०२४) आढावा घेतला. याप्रसंगी सर्व अधिकारी यांचे पंचायत समिती शहापूर मार्फत गटविकास अधिकारी भास्कर रेंगडे यांनी स्वागत केले. आपत्कालीन, दुर्धर आजार, साथरोग आजार नियंत्रण करण्यासाठी नियंत्रण कक्ष व भरारी पथक जिल्हा व तालुका स्तरावर तयार करण्यात येणार आहे. आपत्कालीन परिस्थितीत २४ तास नियंत्रण कक्ष सुरू ठेवावे.‌ पाणी उकळून व गाळून प्यावे यासाठी ग्रामस्थांना माहिती घ्यावी असे ग्रामसेवकांना माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिली.  शहापूर तालुक्यात प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत मंजूर घरकुल ३ हजार ८९५ असून ३७१६ पूर्ण घरकुल व १७९ अपूर्ण घरकुल असल्याने पुढील नियोजन लवकरात लवकर करावे अशा सूचना दिल्या. ग्रामविकास अधिकारी मंगलसिंग बाबुलाल परमार घरकुलाचे १८९ पैकी १८१ घरकुल पुर्ण केल्याने उत्तम कामकाज केल्याने व ग्रामसेवक मंगेश जाधव यांनी १५ वा वित्त आयोग अंतर्गत ग्रामपंचायत कोठेरे येथिल मौजे वेटा पाडा येथे नळ पाणी पाणीपुरवठा संदर्भातील डोंगराळ भागात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले. समाज कल्याण विभागातील ४५ काम पुर्ण केल्याबद्दल अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रुपाली सातपुते यांनी अभिनंदन केले. विभाग निहाय उपलब्ध झालेला निधी पुर्ण खर्च व्हावा यासाठी आपण प्रयत्नशील राहायला हवं. ग्रामस्थांनाच्या कल्याणासाठी काम करताना आपण मोलाचं काम करावं. कृषी विभागाने भाजीपाला लागवड, बियाणे विक्री यासंदर्भात उत्तम काम करित असल्याने कृषी विभागाचे अभिनंदन केले. तालुक्यात १५ वित्त आयोग अंतर्गत अखर्चित रक्कम खर्च करण्यासाठी सुचना उप मुख्य कार्यकारी अधिकारी वैजनाथ बुरडकर यांनी दिले. जनसुविधा अंतर्गत ११२ काम आणि नागरीसुविधा ४३ काम, तिर्थक्षेत्र संदर्भातील ४ काम सुरू आहे. माझी वसुंधरा अतंर्गत सर्व ग्रामपंचायतींमधील कामाची माहिती घेण्यात आली. पीएम विश्वकर्मा अंतर्गत अपूर्ण कामे पुढील आठवड्यात पूर्ण करण्याबाबत माहिती देण्यात आली. मनरेगा अंतर्गत प्रत्येकी ग्रामपंचायत निहाय २०० वृक्षलागवड पुढील सात दिवसात करण्यासाठी सुचना देण्यात आल्या. सामाजिक वनीकरण मार्फत वृक्षलागवड करण्यासाठी वृक्ष उपलब्ध करण्यात आले आहेत. सर्वं कामांचा ग्रामपंचायत निहाय आढावा उप मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद काळे यांनी घेतला.बोगस बियाणे, तांत्रिक तुटवडा, जास्त दरांनी बियाणे विक्री तालुक्यात होऊ नये यासाठी पंचायत समिती कृषी अधिकारी व तालुका स्तरावरील कृषी अधिकारी यांनी तपासणी करावी असे आदेश देण्यात आले. तालुक्यात बियाणांच्या तक्रारींकडे ग्रामसेवकांनी विशेष लक्ष द्यावे. बांबू लागवड करण्यासाठी शेतकऱ्यांचे बैठक घेऊन शेतकऱ्यांना योग्य माहिती द्यावी व शहापूर तालुक्यातील शेतकऱ्यांचे प्रस्ताव जास्तीत जास्त यावे असे आदेश कृषि विकास अधिकारी रामेश्वर पाचे यांनी दिले. आढावा बैठकीस अनुपस्थित असणाऱ्या ग्रामसेवकांना नोटीस बजावण्याचे सक्त सुचना यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी छायादेवी शिसोदे यांनी दिली.
पशुसंवर्धन विभागातील बांधकाम संदर्भात माहिती यावेळी घेण्यात आली. मान्सून पूर्व लसीकरण तालुक्यात १०० टक्के पुर्ण करण्यात आली आहे. तालुक्यातील पशुपालकांना आवाहन करून टॅगिंग करून घेण्यात यावे अशी विनंती पशुसंवर्धन विभाग प्रमुख डॉ. समीर तोडणकर यांनी केले. गाव निहाय चारा आराखडा तयार करण्यासाठी सुचना देण्यात आल्या त्यामुळे ग्रामपंचायत निहाय माहिती देण्यात यावी असे ग्रामसेवकांना आवाहन करण्यात आले. लघुपाटबंधारे विभागाचे सन २०२३-२४ मधील एकूण ३३ काम असून प्रत्येक काम निहाय आढावा उप विभागीय जलसंधारण अधिकारी असिफ सय्यद यांनी माहिती उपस्थितांना दिली. तालुक्यात जलस्रोतचे पाणी नमुने तपासणी करण्याच्या सुचना यावेळी देण्यात आल्या. शहापूर तालुक्यात बाल मृत्यू व माता मृत्यू कमी करण्यासाठी पावसाळ्यात माहेर घर योजना राबविण्यात येणार आहे याद्वारे गरोदर मातांची काळजी घेतली जाणार आहे‌. जननी सुरक्षा योजना यशस्वी राबविण्यासाठी शहापूर तालुक्यात जास्त समस्या असून गरोदर मातेची कागदपत्रे ग्रामपंचायत मार्फत तयार करून द्यावी अशी विनंती डॉ.‌स्वाती पाटील यांनी केली. तालुक्यातील जन्म मृत्यू नोंदी ऑनलाईन पध्दतीने ग्रामसेवक यांनी करावी. तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रावर देखील यांची ऑनलाईन नोंद व्हावी. जल जीवन मिशन कामासंदर्भात ग्रामसेवकांच्या समस्या जाणून घेतल्या व त्यांना अपूर्ण काम निहाय योग्य मार्गदर्शन यावेळी करण्यात आले. चार काम सुरू नसून ती काम लवकर सुरू करण्याच्या सक्त सूचना यावेळी कार्यकारी अभियंता प्रदीप कुलकर्णी यांनी दिले. पाणी टाकी बांधकाम ११४ काम अपुर्ण असून संबंधित अधिकारी यांनी तात्काळ पूर्ण करावे. पुढील एक आठवड्यात अपूर्ण काम सुरू करण्याच्या सुचना दिल्या आहेत तसेच संबंधित कर्मचारी यांच्यावर कारवाई करण्यात येईल असे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिल्या. हायवे लगतच्या सर्व गावांच्या स्वच्छतेसाठी नोटीस बोर्ड, सुशोभीकरण करून कामकाज करावे अशा सुचना देऊन ग्रामसेवकांना आतापर्यंत केलेल्या कामांची माहिती घेण्यात आली. कचरा व्यवस्थापन करण्यासाठी ग्रामपंचायत निहाय प्रयत्न करावे अशी सुचना देण्यात आली. ठाणे जिल्ह्यासाठी आपल्या सर्वांना कचरा व्यवस्थापन करण्यासाठी आपण जबाबदारीने नियोजन करण्यात यावे असे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिले. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ रुपाली सातपुते, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (सा.प्र) अविनाश फडतरे, उप मुख्य कार्यकारी ग्रामपंचायत विभाग प्रमुख प्रमोद काळे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी वैजनाथ बुरडकर, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग प्रदिप कुलकर्णी, कार्यकारी अभियंता संदिप चव्हाण, कृषी विकास अधिकारी रामेश्वर पाचे, पशुसंवर्धन विभाग प्रमुख डॉ. समीर तोडणकर, गटविकास अधिकारी पंचायत समिती शहापूर भास्कर रेंगडे, जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. स्वाती पाटील, उपअभियंता विकास जाधव, उप विभागीय जलसंधारण अधिकारी असिफ सय्यद, कार्यकारी अभियंता समग्र शिक्षा युवराज कदम, विस्तार अधिकारी सांख्यिकी संतोष पांडे, इतर सर्व तालुका स्तरावरील विभाग प्रमुख, मुख्य सेविका, ग्रामविकास अधिकारी, ग्रामसेवक तसेच अधिकारी व कर्मचारी आढावा बैठकीत उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *