नवी दिल्ली : लोकसभा अध्यक्षपदाची निवडणूक येत्या २६ जून रोजी होत असून अध्यक्षपदाचा तिढा कायम आहे. इंडिया आघाडीच्या नेत्यांनी लोकसभा अध्यक्षपदासाठी एनडीएचा घटक पक्ष असलेल्या टीडीपीला पाठिंबा देण्याचे सुतोवाच केले आहे. त्यामुळे चंद्राबाबूंनीही लोकसभा अध्यक्षपदासाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

 दुसरीकडे जेडीयुने आपले इरादे स्पष्ट केले आहेत. जेडीयूचे राष्ट्रीय सरचिटणीस केसी त्यागी यांनी सांगितले की, “काँग्रेस जे काही करत आहे ते लक्ष विचलित करत आहे, ते चुकीचे आहे. कारण परंपरा अशी आहे की सत्ताधारी आघाडीतील सर्वात मोठा पक्षच स्पीकरबाबत निर्णय घेतो. भाजप कोणताही निर्णय घेईल, आम्ही त्याचे समर्थन करू.

लोकसभा अध्यक्षांबद्दल, टीडीपीने म्हटले की सत्ताधारी आघाडीने सभापतीपदासाठी उमेदवार उभा केला पाहिजे. टीडीपीचे राष्ट्रीय प्रवक्ते पट्टाभी राम कोमरेड्डी यांनी सांगितले की, “सभापतीपदाच्या निवडणुकीबाबत एनडीएचे सहयोगी एकत्र बसतील आणि सभापतीपदाचा उमेदवार कोण असेल याचा निर्णय घेतील. एकदा एकमत झाले की आम्ही तो उमेदवार उभा करू आणि टीडीपीसह सर्व मित्र पक्ष उमेदवाराला पाठिंबा देतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *