रस्त्यावरील पदार्थ खाणे म्हणजे आरोग्य बिघडवून घेणे
रस्त्यावर बाराही महिने खाद्यपदार्थ विकले जातात कारण खाणारांची संख्या मोठी आहे. पावसाळ्यात रस्त्यावरील पदार्थ खाणे म्हणजे आरोग्य बिघडवून घेणे अशीच अवस्था असते .उघड्या पदार्थावर माशा,किटक बसतात. विक्रेता आपला माल संपवण्याच्या कामात व्यस्त असतो.प्रत्येक शहरात महानगरपालिका आहेत. त्यांचे आरोग्य खाते दुकानाना तसेच, रस्त्यावरील पदार्थ विक्रेत्यांना अधिकृत परवानगी देते.रस्त्यावरील पदार्थ विक्रेत्याकडे उपाहारगृहा सारखी सुविधा नसते.बटाटा वडा,समोसा,भजी,भेळपुरी ,पाणी पुरी,बटाटा शेवपुरी आवडीने लोक घेतात. चौपाटीवर भेळपुरी,पाणीपुरी ,रगडा पेटीस खाण्यासाठी लोक आवडीने जातात. तेथील स्वच्छता आहे की नाही हे काम आरोग्य विभागाचे आहे.शहरातील उपाहारगृहे,ग्रामीण भागातील उपाहारगृहे,ढाबे येथील स्वच्छता पाहणे तेथील जिल्ह्यातील आरोग्य विभागाची आहे.अन्न व औषध प्रशासन या सर्व विभागाच्या कामकाजावर लक्ष ठरवण्याचे काम करते.मूळात या खात्यातील अन्न व औषध निरीक्षकांची पदे रिक्त आहेत. स्वच्छता निरीक्षक महानगरपालिकांमधील पदे रिक्त आहेत त्यामुळेच असे व्यवसाय करणार्यांवर नियंत्रण नाही असेच म्हणावे लागेल. नागरिकांनीच आपले आरोग्य जपावे म्हणजे रोगराई पासून बचाव होईल.
-महादेव गोळवसकर
कुर्ला मुंबई, मो. नं. ९८६९४७६२०९
mahadeogolvaskar@gmail.com
बकरी ईदच्या दिवशी गोहत्या नको !
राज्यात गोवंश हत्या बंदी कायदा होऊन ९ वर्षे उलटली तरी गोहत्या थांबलेल्या नाहीत. बीफ माफिया आणि कसायांशी काही भ्रष्ट पोलिसांच्या असलेल्या आर्थिक हितसंबंधामुळे राज्यात या कायद्याची म्हणावी तशी अंमलबजावणी अद्याप झालेली नाही. बकरी ईदच्या निमित्ताने दरवर्षी राज्यात मोठ्या प्रमाणात गोहत्या केली जाते हे सर्वश्रुत आहे. गोवंश हत्याबंदी कायदा अमलात आल्यापासून यामध्ये थोडीफार घट झाली असली, तरी या हत्या थांबलेल्या नाहीत. गोहत्या हिंदूंच्या धर्मभावनेशी निगडित असल्यामुळे आणि राज्यासह देशभरात हिंदू बहुसंख्य असल्यामुळे राज्याच्या गृहखात्याने या बाबीकडे विशेष लक्ष देणे अपेक्षित आहे. केवळ कायदा करून कोणताही प्रश्न सुटत नाही, त्यासाठी कायद्याची कठोर अंमलबजावणी होणे आवश्यक असते. राज्यात गोवंश हत्या बंदी कायद्याचीही अवस्था दुर्दैवाने अन्य कायद्यांप्रमाणेच झाली आहे. माननीय मुख्यमंत्री एका हिंदुत्ववादी पक्षाचे पक्षप्रमुख आहेत, असे असताना या कायद्याची म्हणावी तशी अंमलबजावणी न होणे खरेतर लाजिरवाणेच आहे. किमान यावर्षी तरी सरकारने राज्यभरात चोख बंदोबस्त ठेऊन बकरी ईदच्या निमित्ताने कुठेही गोहत्या होणार नाहीत, याची दक्षता घ्यावी.
– सौ. मोक्षदा घाणेकर,
काळाचौकी, मुंबई
