पोलीस निरीक्षक कारवाई करतील का?
कर्जत : तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवैध धंदे सुरू आहेत. मात्र स्थानिक पोलीस निरीक्षक याबाबत कोणतीच भूमिका घेताना दिसून येत माहित. खरंतर अवैध धंद्यांना आळा घालण्याची जबाबदारी पोलिसांवर असते. आपली सद्सदविवेक बुद्धी वापरून अधिकाऱ्यांनी कारवाई करणे अपेक्षित असताना जाणीवपूर्वक दुर्लक्ष करणारे अधिकारी यामध्ये काही आर्थिक हितसंबंध ठेऊन आहेत का? असा संशय व्यक्त केला जात आहे.
महाराष्ट्र (मुंबई) जुगार प्रतिबंध अधिनियम १८८७ नुसार राज्यात विनापरवाना खेळल्या जाणाऱ्या जुगारास प्रतिबंध करणे हा मुख्य उद्देश ठेऊन राज्यात जुगार,मटका यावर कारवाई होत आहेत. मात्र कर्जत तालुक्यात अशा प्रकारच्या कारवाई होताना दिसून येत नाहीत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार कर्जत तालुक्यात मोठ्या प्रमाणात गुटखा, गांजा, अमली पदार्थ, अवैध दारू यांची विक्री होताना दिसून येत आहे. तरुणाई याच्या आहारी जात आहे. मोठ्या प्रमाणात मटका, जुगार सुरू असून याला अभय कुणाचे असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे. मोठमोठ्या इंटरनॅशनल महाविद्यालय परिसरात अमली पदार्थांचे सेवन होत असल्याचे सुद्धा येथील स्थानिकांच्या निदर्शनास येत आहे. सामान्य शेतकरयांना त्रास देणारे अधिकारी अशा ठिकाणी आपली सदसदविवेक गहाण टाकतात का असा प्रश्न सुद्धा जाणकारांना पडला आहे.
अलीकडे फेब्रुवारी महिन्यात कर्जत शहरातील नाना मास्तर नगर येथील एका फॉर्म वर जुगाराच्या अड्ड्यावर स्थानिक गुन्हे अन्वेषण रायगड यांनी धाड टाकून लाखो रुपयांचा ऐवज हस्तगत केला. शहरामध्ये अनेक दिवस सुरू असलेल्या या जुगार अड्ड्याबाबत कर्जत पोलीस स्टेशन मात्र अनभिज्ञ कसे हा प्रश्न देखील शिल्लकच राहिला. कर्जत पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक आपली सदसदविवेक बुध्दी वापरून यावर कायदेशीर कारवाई करतील का याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
000000
