मुंबई : दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने शनिवार दिनांक २२ जून २०२४ या दिवशी सायंकाळी पाच वाजता युवा संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम प्रीती ठाकोरभाई देसाई यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आयोजित करण्यात आला आहे. यावेळी कु. सई काटदरे यांचे गायन होणार असून त्यांना तबल्यावर राकेश कुळकर्णी तर संवादिनीवर अभिषेक काथे साथ देतील. त्यानंतर कु. अदिती कोरटकर यांचे गायन होणार असून त्यांना तबल्यावर तनय रेगे तर संवादिनीवर ओंकार अग्निहोत्री साथ देतील. अधिकाधिक रसिकांनी यावेळी उपस्थित रहावे, असे आवाहन केंद्राच्या वतीने करण्यात आले आहे.
