मुंबई : मुंबईतून मान्सून दाखल होऊन आठवडा उलटून गेला तरीही मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांनी तळ गाठला आहे. धरणक्षेत्रात पावसाने दडी मारल्याने एकुण सात पैकी पाच जलाशयांनी तळ गाठला असून दोन जलाशयांमध्ये शुन्य पाणीसाठी शिल्लक आहे. मुंबईत एकूण पाणीपुरवठा करणाऱ्या सात जलाशयांमध्ये  ५.३८ टक्के इतकाच पाणीसाठा आहे.  येत्या काही दिवसांत सातही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस झाला नाही तर मुंबईवरील पाणीकपातीचे संकट आणखी गडद होण्याची भीती आहे.१जूनपासून मुंबईत १० टक्के पाणीकपात सुरुच आहे.

मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, विहार, तुळशी आणि राज्य सरकारच्या अप्पर वैतरणा, भातसा या सात तलावांतून मुंबईला पाणीपुरवठा होतो. या तलावांची पाणी साठवणक्षमता १४  लाख ४७ हजार ३६३  दशलक्ष लिटर आहे. या तलावांतून दररोज  पाणीपुरवठा विविध जलवाहिन्यांद्वारे करण्यात येतो. पावसाची  हुलकावणी,  वाढलेला उष्मा आणि पाण्याची मागणी आणि तलावांतील पाण्याचे मोठ्या प्रमाणात होणारे बाष्पीभवन यांमुळे तलावांतील पाण्याची पातळी घटली आहे. सध्या  मुंबईला २० ते २२ दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा आहे.  मुंबईत पाणी संकट अधिक गडद होण्याची शक्यता अप्पर वैतरणा आणि भातसा जलाशयात शून्य टक्के पाणीसाठा आहे.

आज जलाशयात म्हणून एकूण ७७८५१ दशलक्ष लिटर इतकाच पाणीसाठा  शिल्लक आहे. दररोज ३८०० दशलक्ष लीटर एवढा पाणीपुरवठा होतो.  यामध्ये दहा ते पंधरा टक्के पाणी कपात  सध्या करण्यात आली आहे.

राज्यात ऊन-पावसाचा खेळ

राज्यात ऊन-पावसाचा खेळ पाहायला मिळत आहे. काही भागात जोरदार पाऊस सुरु आहे, तर काही भागात पावसाने गेल्या काही दिवसांपासू दांडी मारली आहे. मुंबई आणि ठाणे जिल्ह्यात पावसाने दडी मारली आहे. जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मुंबई आणि ठाणे जिल्ह्यातील नागरिकांना कोसळधारेने भिजवणारा पाऊस आता गायब झाला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील २४ तासांसाठी मुंबई शहर आणि उपनगरांसाठी स्थानिक अंदाज आहे. साधारणपणे ढगाळ आकाश आणि शहर आणि उपनगरात मघेगर्नजसेह हलका ते मध्यम पावसाची शक्यता आहे. कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३४°C आणि २६°C च्या आसपास असेल.

कोणत्या जलाशयात  किती पाणीसाठा उपलब्ध?

अप्पर वैतरणा -० टक्के

मोडक सागर – १५.७३ टक्के

तानसा – २२.०५ टक्के

मध्य वैतरणा – ९.६४ टक्के

भातसा – ०टक्के

विहार – १७.९२ टक्के

तुळसी- २४.४६ टक्के

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *