मुंबई : मुंबईतील धारावी मतदारसंघाच्या काँग्रेस पक्षाच्या आमदार व माजी शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी आज आमदारपदाचा राजीनामा विधानसभा अध्यक्ष ऍड. राहुल नार्वेकर यांच्याकडे सुपूर्द केला .
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत प्रा. वर्षा गायकवाड ह्या २९ उत्तर मध्य मुंबई मतदारसंघातून विजयी होऊन खासदार झाल्या आहेत म्हणून त्यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे.
