आंबेडकरवादी अध्ययन सवर्धन समितीचा इशारा
ठाणे : अनुसूचीत जाती जमतीच्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी देण्यात येयांर्य परदेशी शिक्षण शिष्यवृतीत राज्य शासनाने बादल करून जाचक अटींचा समावेश केला. यामुळे अनुसूचीत जातींच्या सवलती असलेल्या विद्यार्थ्यांना याचा फटका बसत असतानाच विद्यार्थ्यांच्या शिक्षणात अडचणी निर्माण करण्याचा कुटिल डाव असल्याचा दावा ठाण्यातील पत्रकार परिषदेत सर्वपक्षीय फुले, शाहू आणि आंबेडकरी विचारसरणीच्या कार्यकर्त्यांनी आंबेडकरवादी अध्ययन सवर्धन समितीद्वारे नव्या जीआर मधील अटीवर अभ्यास करून जीआर माडील जाचक अटी रद्द करीत पूर्वी असलेल्या जीआर प्रमाणे शिष्यवृत्ती प्रक्रिया राबविण्यात यावी अशी मागणी केली. राज्य सरकारने यावर लक्ष केन्द्रित न केल्यास जीआरची होली करून राज्य भर तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.
पूर्वीच्या जीआरमध्ये अनुसूचीत जाती-जमतीच्या विद्यार्थ्यांना देण्यात येणार्या परदेशी शिक्षण शिष्यवृती यामध्ये विद्यार्थ्यांचे वार्षिक उत्पन्न हे ८ लाखापेक्षा जास्त नसावे तसेच परेशात शिक्षण घेणार्या विद्यापीठाचे मांनाकन २०० च्या आतमध्ये असावे अशाच विद्यार्थ्यांना या शिष्यवृत्तीच लाभ मिळणार आहे. त्यामुळे आता नव्या २०२३-२४ या वर्षाच्या नव्या जीआरमध्ये या नव्या अटींचा समावेश करून विद्यार्थ्यांच्या परदेशातील शिक्षणाचे कंबरडे मोडण्याचा कुटिल डाव असल्याच्या प्रतिक्रिया रिपाईचे ठाणे जिल्हा अध्यक्ष भास्कर वाघमारे, बीआरएसपीचे पदाधिकारी प्रभाकर जाधव, डॉ. शिंदे यांनी कार्यकर्ते यांनी व्यक्त केल्या. या नव्या जीआरमध्ये शिष्यवृतीची मर्यादा पदवी आणि पदवी नंतर शिष्यवृतीसाठी 30 लाख तर पीएचडीसाठी 40 लाखाची शिष्यवृती निश्चित करण्यात आलेली आहे. तसेच पदवी परीक्षेत 75 टक्के गुणाची नवीन अट ठेवण्यात आलेली आहे. पूर्वी हीच अट ५५ टक्के गुणाची होती. शिक्षणासाठी शिष्यवृतीचा लाभ एका कुटुंबातील एकच विद्यार्थी घेऊ शकतात अशा जाचक अटीमुळे अनुसूचीत जाती जमतीतील विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खोडा घालण्याचा कुतुलडव उधळून लावण्यासाठी आता शाहू, फूल आणि आंबेडकर विचारसरणीच्या पक्षांनी कंबर कसलेली असून रस्त्यावर उतरून नव्या जीआरचे दहन करून राज्यभर आंदोलने करणायचा इशारा आंबेडकरवादी अध्ययन सवर्धन समितीने दिलेला आहे. लवकरच ठाण्यात आंदोलांनाच्या तयारीचा आराखडा निश्चित करण्यासाठी राज्यातील आंबेडकरी विचारसरणीच्या संस्था, पक्ष यांची बैठक होणार असलायचे रिपाई ठाणे जिल्हा अध्यक्ष भास्कर वाघमारे आणि बीआरएसपीचे पदाधिकारी प्रभाकर जाधव, यांनी दिला आहे.
0000
