अशोक गायकवाड*
नवी मुंबई : महापालिका आयुक्त् डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार लोकसहभागातून विभागवार स्वच्छता मोहीमा राबविल्या जात असून त्यामध्ये स्वच्छताप्रेमी संस्था व नागरिकांप्रमाणेच विदयार्थी युवकांचाही मोठया प्रमाणावर सहभाग असतो. अशाच प्रकारची विशेष स्वच्छता मोहीम आज तुर्भे विभाग कार्यालय क्षेत्रात सेक्टर.१० सानपाडा येथे विदयार्थी व नागरिकांनी यशस्वी केली स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.*
महापालिका आयुक्त् डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार, अतिरिक्त् आयुकत् सुनिल पवार यांच्या नियंत्रणाखाली से.१० सानपाडा येथील वृक्षांच्या हरित पट्टयात ही स्वच्छता मोहीम राबविण्यात येऊन त्यामध्ये १५ गोणी प्लास्टिक व तत्सम कचरा गोळा करण्यात आला. या मोहीमेमध्ये घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उप आयुक्त् डॉ. अजय गडदे, तुर्भे विभाग अधिकारी तथा सहा आयुकत् भरत धांडे आवर्जुन सहभागी झाले होते. वेस्टर्न कॉलेजचे एनएसएस विदयार्थी यांच्यासह डि-मार्ट मधील कर्मचारी व कामगार यांच्या सक्रिय सहभागाने यशस्वी झालेल्या या मोहिमेच्या आयोजनात स्वच्छता अधिकारी जयेश पाटील, स्वच्छता निरीक्षक व सफाई मित्र आणि पर्यवेक्षक उत्साहाने सहभागी झाले होते. यावेळी उपस्थितांना पर्यावरणाविषयी जागरूकता तसेच प्लास्टिक प्रतिबंधाबाबत माहिती देण्यात आली.