राजीव चंदने
मुरबाड : मान्सून दाखल झाला नसला तरी, मान्सून पूर्व पावसाने चांगली हजेरी लावत उघडीप दिल्याने यंदा तालुक्यातील शेतकऱ्यांची पेरणी सफल झाली आहे. त्यामुळे शेतकरी आनंदात आहे, दरवर्षी जुनच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात धुमशान घालणाऱ्या मान्सून ने मुरबाड तालुक्यात हजेरी लावण्यात उशीर केला असला तरी अधून मधून पावसाची रिपरिप सुरु आहे, हे वातावरण भातशेती साठी आणि पेरणी साठी योग्य ठरले आहे, मागील वर्षी पेरणी केल्या नंतर पावसाने भरमसाठ बॅटिंग केली होती त्यावेळी पेरलेलं बियाणे तरंगले, रुजलेले पाण्यात कुजले, काही बियाणे वाहून गेले त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट कोसळले होते. त्यावेळी शेतकऱ्यांना “रुजा ” (घरातच भात बियाण्यास मोड आणून तो शेतात पेरणे ) करण्याची वेळ आली होती. मात्र यंदा असे झाले नाही त्यामुळे तालुक्यातील बहुतेक ठिकाणी भातरोपे किमान वित भर वाढले आहेत.
त्यात यावर्षी भात बियाणेची किंमतही वाढली आहे. खतांची किंमतही वाढली आहे.असे असताना पावसाने एक प्रकारे यावर्षी उपकारच केले आहेत अशी भावना शेतकरी व्यक्त करत असून त्यामुळे तालुक्यातील शेतकरी वर्ग सुखावला आहे.
यावर्षी चांगला पाऊस आहे. पावसाने चांगली उघडीप दिली भातरोपे चांगली झाली आहेत शेतकरी शेतीपयोगी वस्तू बी, बियाणे, औजारे यांच्या किमती वाढीव झाल्या आहेत,….रमेश हिंदुराव, शेतकरी न्हावे सासणे
0000
