माथेरान : माथेरान या पर्यटन नगरीत मुख्य प्रवेशद्वारा पासूनच येणाऱ्या पर्यटकांना शहरात येण्यासाठी वाहतुकीच्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.त्यातच मुख्य रस्त्यावरील नव्याने लावण्यात आलेल्या क्ले पेव्हर ब्लॉकच्या रस्त्याना अनेक ठिकाणी खड्डे पडल्यामुळे पायी चालत येणाऱ्या पादचाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत असून ह्या ब्लॉकच्या रस्त्यात काही निकृष्ठ दर्जाच्या ब्लॉकची माती होऊन जागोजागी खड्डे पडले आहेत.
उन्हाळ्यात हे खड्डे बुजविण्यासाठी काही संघटनानी पुढाकार घेतला होता परंतु नेहमीच विकासाला विरोध करणाऱ्या काही मंडळींनी पर्यावरण वाद्याना सदर बाबतीत माहिती देऊन रस्ते आहेत त्याच परिस्थितीत राहावे असे बोलले जात आहे.
याच रस्त्यावरून पर्यटक, शालेय विद्यार्थी, आबालवृद्ध त्याचप्रमाणे घोडे,ई रिक्षा जात असतात. या खड्डयामुळे अनेक पर्यटकांना पाय मुरंगळुन दुखापत झाली आहे. याबाबत संबंधित प्रशासनाने ठोस उपाययोजना करून सर्वाना सुरक्षितपणे प्रवास करता यावा यासाठी प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे स्थानिक बोलत आहेत.
0000
