ठाणे : वस्तू व सेवा कर कार्यालय, ठाणे येथील कार्यालयीन कामकाजाकरिता ठाणे महानगर क्षेत्राच्या हद्दीतील मध्यवर्ती ठिकाणी व्यवसायिक स्वरुपाची सुमारे 12000 चौ.फुट ते 14000 चौ.फुट इतक्या जागेची आवश्यकता आहे. इच्छुक मालमत्ताधारकांनी यासाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन राज्यकर सह आयुक्त, ठाणे यांच्या कार्यालयामार्फत करण्यात आले आहे.
इच्छुक मालमत्ता धारकांनी मालमत्ता भाडे तत्त्वावर देण्यासाठीच्या प्रस्तावासह राज्यकर सहआयुक्त (प्रशा.), कार्यालय, ठाणे, 3 रा मजला वस्तु व सेवा कर कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय आवार, कोर्ट नाका, येथे संपर्क साधावा, असे ठाणे राज्यकर सह आयुक्त (प्रशासन) यांनी कळविले आहे.
00000000
