दादरमधील हक्क सभेत हजारो घरकामगारांची उपस्थिती
धारावी : राज्यातील लाखो घरेलु कामगारांना न्याय द्यावा, अशी मागणी दादरमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन येथे मंगळवारी झालेल्या हक्क सभेत करण्यात आली. राज्यातील १२०० घरकामगार, प्रतिनिधींची यावेळी उपस्थिती होती.घरकामगारांना सामाजिक न्याय, संरक्षण, आरोग्य विमा आणि सन्मानाचे निवृत्तीवेतन मिळावे, महाराष्ट्र राज्य घरेलु कामगार कल्याण मंडळ कायद्यांतर्गत सुधारणा, घोषित योजनांची अंमलबजावणी करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. राष्ट्रीय घरकामगार चळवळ, महाराष्ट्र यांच्या वतीने या हक्क सभेचे नियाेजन करण्यात आले होते. घरकामगार हक्क सभेला राज्य मानव अधिकार आयोगाचे (स्टेट ह्युमन कमिशन) एम. ए. सयीद, राज्य महिला आयोगाच्या सदस्या गौरी छाब्रिया, महाराष्ट्र राज्य घरेलु कामगार कल्याण मंडळाचे सहाय्यक आयुक्त विजय शिंदे यांनी मार्गदर्शन केले. मागण्यांसंदर्भात राज्य सरकारला शिफारस व सूचना करण्याचे आश्वासन दिले असल्याचे राष्ट्रीय घरकामगार चळवळ महाराष्ट्रचे समन्वयक ज्ञानेश पाटील यांनी सांगितले.
0000
