३५१व्या श्री शिवराज्याभिषेक दिनाच्या निमित्ताने ठाणे महापालिकेतर्फे मासुंदा तलाव येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारुढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. याप्रसंगी, ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त (मुख्यालय) जी. जी. गोदेपुरे, उपायुक्त (परिमंडळ २) शंकर पाटोळे, नौपाडा प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त सोपान भाईक, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी यासिन तडवी, माजी ज्येष्ठ नगरसेवक संजय वाघुले, राज्याभिषेक समारोह संस्थेचे शंतनू खेडकर आदी उपस्थित होते.
00000