ठाणे : शारदा संकल्प प्रतिष्ठान व भारतीय जनता पार्टी प्रभाग क्रमांक 11 च्या वतीने आयोजित आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून आज गोकुळ नगर येथील वर्धमान हॉल येथे सकाळी 9 ते 10 च्या दरम्यान सदर योगा कार्यक्रमाचे आयोजन ठाणे महानगरपालिकेचे माजी नगरसेवक कृष्णा दादू पाटील,माजी नगरसेविका सौ.नंदा कृष्णा पाटील व भारतीय जनता पक्षाचे ठाणे शहर सरचिटणीस सचिन दादू पाटील यांच्या पुढाकाराने सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी अंबिका योग कुटीरच्या प्रतिनिधीनी प्रत्यक्षिक दाखवून सर्वांना योगाचे धडे दिले तसेच उपस्थित स्त्री पुरुष सर्वांनी योगा करून कार्यक्रम उत्कृष्टरित्या संपन्न झाला.
सदर कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्रजी मोदींचं एक पेड मां के नाम या संकल्पनेनुसार माजी नगरसेवक कृष्णा पाटील व माजी नगरसेविका सौ नंदा पाटील यांच्या हस्ते उपस्थित मान्यवरांचे शाल व महिलांना वटपौर्णिमेच्या निमित्ताने वडाची झाड देण्यात आली. तसेच आंबा, पिंपळ, बदाम यासारखी झाडे ही भेट देण्यात आली.
तसेच या कार्यक्रमाचे उत्कृष्ट आयोजन केल्याबद्दल सर्वांनी नगरसेवक कृष्णा पाटील व नगरसेविका नंदा पाटील यांचे आभार व्यक्त केले. सदर कार्यक्रमात भारतीय जनता पक्षाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते नागरिक बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
00000
