अशोक गायकवाड
रायगड : पात्र असूनही शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळाल्यास इतर मागासवर्ग विमुक्त व भटक्या जमाती विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना आर्थिक मदत करण्यासाठी इतर मागास बहुजन कल्याण विभागाने ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना सुरु केली असून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेसाठी अर्ज करावेत, असे आवाहन सहायक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण विभाग सुनिल जाधव यांनी केले आहे.
बारावी उत्तीर्ण केलेल्या व विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण तसेच व्यावसायिक शिक्षण घेण्यासाठी मदत होणार आहे. इयत्ता बारावी नंतरच्या व्यावसायिक तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेतलेल्या परंतु शैक्षणिक संस्थेच्या वसतिगृहामध्ये मोफत प्रवेश घेतलेल्या परंतु शैक्षणिक संस्थेच्या वसतिगृहामध्ये मोफत प्रवेश न मिळालेल्या इतर मागासवर्ग व विमुक्त जाती व भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी भोजनभत्ता, निवासभत्ता व निर्वाहभत्ता उपलब्ध करुन दिला जात आहे.
गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक आर्थिक सहाय्य देण्यासाठी ही योजना राबविण्यात येत आहे. ओबीसी, एसबीसी, व्हीजे, एनटी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना वसतिगृहात प्रवेश न मिळाल्यास त्यांना या योजनेचा लाभ मिळतो. मोठया शहरातील भोजनभत्ता ३२ हजार, निवास भत्ता २० हजार, उदरनिर्वाह भत्ता ८ हजार मिळतो तर जिल्हा पातळीवर भोजन भत्ता २५ हजार निवास भत्ता १२ हजार उदरनिर्वाह ६ हजार रुपये मदत दिली जाते. पात्र विद्यार्थ्यांना काय मिळणार :- ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेंतर्गत विद्यार्थ्यांना वार्षिक ६० हजार रुपयांपर्यंत आर्थिक सहाय्य दिले जाते. पात्र विद्यार्थ्यांना भोजनभत्ता, गृहनिर्माण भत्ता, राहणीमान भत्ता अशा विविध स्तरावरील भत्ते दिले जातात. या माध्यमातून अनेक गरजू विद्यार्थ्यांना लाभ मिळत असून उच्च शिक्षणासाठी मदत होत असते. या लागणारी कागदपत्रे :-विद्यार्थी ओबीसी, व्ही.जे.एन.टी., एसबीसी, प्रवर्गातील असावा, अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरु असणे आवश्यक आहे, अभ्यासक्रमाशी संबंधित शैक्षणिक कागदपत्रे असावीत. अर्ज सादर करण्याकरीताचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे :- उच्च शिक्षणाचे द्वितीय, तृतीय व चतुर्थ वर्ष-अर्ज स्विकारण्याची तारीख २० जून २०२४, अर्ज स्विकारण्याचा शेवटचा दिनांक-१५ जुलै २०२५, निवड यादी जाहीर करण्याचा दिनांक ०१ ऑगस्ट २०२४. उच्च शिक्षणाचे प्रथम वर्ष- अर्ज स्विकारण्याची तारीख ०५ ऑगस्ट २०२४, अर्ज स्विकारण्याचा शेवटचा दिनांक-२० ऑगस्ट २०२४,, निवड यादी जाहीर करण्याचा दिनांक ०२ सप्टेंबर २०२४. ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेच्या लाभासाठी सहाय्यक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण, रायगड, कच्छिभवन, नमिनाथ जैन मंदिरा जवळ, श्रीबाग रोड, अलिबाग, जि.रायगड या कार्यालयात अर्ज कसा करावा व कोठे करावा या संबंधी माहिती दिली जाईल.
