माथेरान : माथेरान मध्ये आज माथेरान नागरी सहकारी पतसंस्था यांच्या माध्यमातून 85 व्या वर्धापन दिनानिमित्त येथील स्थानिक व पर्यटकांना एक वेगळी भेट देताना स्वतःचे एटीएम सुरू केले आहे यामुळे पर्यटकांना होणारे गैरसोय दूर होणार असून आज पहिल्याच दिवशी अनेक पर्यटकांनी एटीएम मधून पैसे काढण्यासाठी रांगा लावलेल्या पाहावयास मिळाल्या.
मागील वर्षे माथेरान नागरी सहकारी पतसंस्थेचे संचालक मंडळाची निवडणूक पार पडली होती यावेळी निवडणुकी सामोरे जाताना शिवराष्ट्र पॅनलने एका वर्षामध्ये स्थानिक व नागरिकांसाठी एटीएम सुरू करू असे आश्वासन दिले होते त्याची पूर्तता करताना आज येथील पतसंस्थेच्या कार्यालयामध्ये नवीन एटीएम सुरू करण्यात आले.
स्वातंत्र्यवीर भाई कोतवाल यांनी स्थापन केलेल्या या पतसंस्थेने आज आपला 85 वा वर्धापन दिन सोहळा सादर केला त्यानिमित्ताने पतसंस्थेच्या कार्यालयांमध्ये सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी माथेरान मधील संस्थेचे ठेवीदार कर्जदार व अनेक स्थानिक नागरिक उपस्थित होते त्यांचे स्वागत पतसंस्थेचे सभापती अजय सावंत यांनी केले व एटीएम चे शुभारंभ ही सभापती अजय सावंत यांच्या शुभहस्ते करण्यात आला.
माथेरान मध्ये युनियन बँकेचे एटीएम आहे परंतु नेहमीच या ठिकाणी विविध समस्यांमुळे हे एटीएम बंद असते ऐन पर्यटन हंगामामध्ये हे एटीएम बंद असल्याने पर्यटकांना त्याचा नाहक भुर्दंड सोसावा लागत असतो, त्यामुळेच माथेरानमध्ये दुसरे एटीएम असावे अशी येथील स्थानिकांची गेल्या अनेक वर्षापासून ची मागणी होती त्याची पूर्तता झाल्याने येथील नागरिकांनी आनंद व्यक्त केला आहे.यावेळी सर्व अभ्यासू संचालक मंडळ ,कर्मचारी वर्ग,सचिव उपस्थित होते.
माथेरान मध्ये युनियन बँकेचे एटीएम नेहमीच बंद असल्याने पर्यटक व स्थानिकांची होत असलेली गैरसोय पाहून मात्र संस्थेचे स्वतःचे एटीएम सुरू करू असा शब्द स्थानिकांना आम्ही दिला होता त्याची पूर्तता करताना आजपासून 24 तास हे एटीएम पर्यटक व स्थानिकांच्या सेवेस उपलब्ध असेल.
-अजय काशिनाथ सावंतसभापती माथेरान नागरी सहकारी पतसंस्था
